शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मालवणात मुसळधार; बाजारपेठेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 17:26 IST

गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मुसळधार पावसाचा फटका बाजारपेठेसही बसला असून शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे.

ठळक मुद्देमालवणात मुसळधार; बाजारपेठेला फटका गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण

मालवण : गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मुसळधार पावसाचा फटका बाजारपेठेसही बसला असून शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे.यावर्षीच्या गणेशोत्सवावर पावसाचे सावट कायम असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे भाविक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. परिणामी बाजारपेठेत दरवर्षीसारखी होणारी उलाढाल ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे.

हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. पाच दिवसांच्या गणरायांचे दर्शन घेण्यासाठी मित्रपरिवार एकमेकांच्या घरी जातात. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने गणेश दर्शन घेण्यासही भाविकांना अडचणीचे ठरत आहेत.गणेशोत्सव काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासूनच बुधवारी तिसºया दिवशीही दोन-तीन तास सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे भक्तांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.मालवण तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ५५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. गुरामवाडी येथील गुराम व आचरा येथील मालवणकर यांच्या घरांची भिंत कोसळून नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग