कणकवली : पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम वृद्ध निराधाराना आधार देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्यातील पुढचा टप्पा म्हणजे कुणाचाही आधार नसलेल्या तरुणीला आणि तिच्या बालकाला आजी - आजोबांसह अनेक नातेवाईक मिळाले. तसेच त्या नवजात बालकाचा नामकरण विधीही कणकवली शहरालगतच्या वागदे गोपुरी आश्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या उपक्रमातून एक नवा आदर्श संविता आश्रमाचे संचालक संदीप परब यांनी समाजासमोर घालून दिला आहे. त्यामुळे त्यांचे समाजातून कौतुक केले जात आहे.कुमारी माता झालेल्या एका तरुणीचा समाज आणि नातेवाईकांनी स्वीकार करण्यास नकार दिला. आता आपणाला कुणाचा आधार मिळेल या विवंचनेत असलेल्या त्या तरुणी बाबत माहिती संविता आश्रमाचे संचालक संदीप परब यांना मिळाली ते तिच्यासाठी व तिच्या नवजात बालकासाठी देवदूत बनले . आश्रमाच्या माध्यमातून माता आणि बालकाचा सांभाळ आपण करू याची हमी देत परब यांनी त्या बाळाला आणि त्याच्या आईला आपल्या आश्रमात आश्रय दिला.त्यानंतर रविवारी कणकवली तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि संविता आश्रम यांच्यावतीने त्या नवजात बालकाचा नामकरण विधी सोहळा वागदे गोपुरी आश्रम येथे थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी "साहस' असे नामकरण झालेल्या बालकाला शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यासाठी कणकवलीवासीयांनी गर्दी केली होती. तसेच त्या बालकाचे शिक्षण आणि करिअरसाठी मदत करण्याचीही ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.परंपरेच्या नावाखाली अनेक बालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अथवा नाकारणाऱ्या समाजाला संविता आश्रमाच्या या कृतीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अनेक निराधारांना आधार देणारा संविता आश्रम आणि त्याचे संचालक संदीप परब यांचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगत उपस्थितांनी यावेळी त्यांचे कौतुक केले . तसेच या सामाजिक कार्यासाठी त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांच्या या कार्यात त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
निराधाराना दिला आधार; नूतन बालकाचे केले नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 16:24 IST
पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम वृद्ध निराधाराना आधार देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्यातील पुढचा टप्पा म्हणजे कुणाचाही आधार नसलेल्या तरुणीला आणि तिच्या बालकाला आजी - आजोबांसह अनेक नातेवाईक मिळाले.
निराधाराना दिला आधार; नूतन बालकाचे केले नामकरण
ठळक मुद्देनिराधाराना दिला आधार; नूतन बालकाचे केले नामकरणसंविता आश्रमाचा समाजासमोर एक नवा आदर्श !