शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

शाश्वत विकासाचा बारामती पॅटर्न: आधुनिक तंत्रज्ञानातून समृद्ध शेतीचा मूलमंत्र

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 29, 2025 16:54 IST

बारामती कृषी विज्ञान केंद्र : उत्पादन, उत्पादकता, उत्पन्न वाढविण्यासाठी कार्यरत, शेतकऱ्यांसाठी ठरतेय लाभदायक

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : संशोधन संस्थांमध्ये तंत्रज्ञान निर्मितीमधील वेळ कमी करून ते शेतकऱ्यांच्या शेतात हस्तांतरित करणे आवश्यक असते. जेणेकरून शेती आणि संबंधित क्षेत्रांमधून उत्पादन, उत्पादकता आणि उत्पन्न शाश्वत आधारावर वाढेल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यभरात कृषी विज्ञान केंद्रांची रचना करण्यात आली आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे विज्ञान केंद्र असून येथील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याचे बहुमूल्य कार्य करीत आहे.बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र हे १ ऑगस्ट १९९२ रोजी भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या संलग्नतेखाली स्थापन झालेले जिल्हास्तरीय कृषी विज्ञान केंद्र आहे. केव्हीके बारामती हे भारतातील मॉडेल, हाय-टेक आणि राष्ट्रीय  पुरस्कार विजेते आहे, जे शाश्वत शेतीच्या विकासासाठी गेल्या ३० वर्षांपासून शेतकरी समुदायासाठी काम करत आहे.बारामती शहराच्या पश्चिमेला ६ किलोमीटर अंतरावर हे केंद्र आणि यजमान संस्था फार्म आहे. या केंद्रात तंत्रज्ञान मूल्यांकन आणि प्रात्यक्षिकासाठी एकूण ४४ हेक्टर जमिनीपैकी लागवडीखालील आणि प्रात्यक्षिकासाठी एकूण जमीन ३०.०३ हेक्टर, दुग्ध व्यवसाय १.६ हेक्टर, नर्सरी १.४ हेक्टर, पॉलिहाऊस ०.४० हेक्टर, केव्हीके आणि यजमान संस्था  इमारती ३.४ हेक्टर, विहीर  आणि पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या २.४ हेक्टर आणि रस्ते ४.७७ हेक्टर आहे. प्रात्यक्षिक फार्मचा वापर नवीन तंत्रज्ञानाच्या शेतातील चाचणीसाठी केला जातो. चांगल्या दर्जाचे बियाणे आणि  रोपे तयार करण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो.AI कृषी प्रकल्पऊस शेतीसाठी बारामतीत AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, ज्याची   दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे.‘पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ अंतर्गत बारामती उपविभागात १०७ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

पवारांनी बारामतीचा चेहरा-मोहरा बदललाबारामती ही आमची जन्म आणि कर्मभूमी आहे. हे आमचे भाग्य समजतो. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येथे विकासाची गंगा वाहत आहे. दुष्काळी भागात नंदनवन फुलवून बारामतीचा चेहरा-मोहरा बदलण्यामागे पवारसाहेबांनी गेली  चार दशके येथे प्रचंड मेहनत घेतली आहे. बारामतीसारख्या छोट्याशा तालुक्यात आज निर्माण झालेल्या शैक्षणिक हबमुळे २५ ते ३० हजार विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. अनेक अभ्यासक देश-विदेशातून बारामती पॅटर्नचा अभ्यास करायला येथे येत आहेत.  - नितीन सातव, खासदार सुप्रिया सुळेंचे स्वीय सहायक

कृषी विज्ञान केंद्रात काय पाहाल ?

  • प्रशासकीय इमारत, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र (एटीआयसी).
  • प्रात्यक्षिक प्लॉट, हाय-टेक ग्रीन हाऊस, पॉलिहाऊस.
  • माती, पाणी, पाने आणि पित्त चाचणी प्रयोगशाळा.
  • पोल्ट्री हॅचरी, शेळी आणि मेंढ्या युनिट
  • सौर मोटारसह पाण्याची साठवणूक टाकी, स्वयंचलित  फर्टिगेशन युनिट.
  • फिश हॅचरी, कृषी आणि इको पर्यटन, हायड्रोफोनिक युनिट, नर्सरी.
  • कॉन्फरन्स  हॉल, ऑडिओ व्हिज्युअल प्रशिक्षण सभागृह.
  • वनस्पती आरोग्य क्लिनिक आणि जैव-नियंत्रण प्रयोगशाळा.
  • ग्रेडिंग आणि पॅकिंग युनिट, मधमाश्या पाळण्याचे युनिट.
  • शेतकरी वसतिगृह, सैल गृहनिर्माण दुग्धशाळा
  • सायलेज प्रात्यक्षिक युनिट, एकात्मिक मासे आणि कुक्कुट  पालन युनिट.
  • हाय-टेक शेतीसाठी  इंडो-डच प्रकल्प, वीज निर्मितीसाठी पवन सौर संकरित प्रणाली, शेतकरी भेटीचे नियोजन.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBaramatiबारामतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी