शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निधी गैरव्यवहारप्रकरणी बांबुळी ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:04 IST

कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर यांना दोषी धरत निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देत्रयस्थ समितीची चौकशी पूर्ण

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर यांना दोषी धरत निलंबित करण्यात आले आहे.

 कुडाळ गटविकास अधिकारी स्तरावरून आलेल्या चौकशी अहवालावर जिल्हा परिषद प्रशासनाचे समाधान न झाल्याने देवगड गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीची चौकशी पूर्ण झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग निधीत अनियमितता असल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झाली होती. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश कुडाळ गटविकास अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर चौदाव्या वित्त आयोग निधीत अनियमितता आढळून आली. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी बांबुळी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर याला ७ एप्रिल रोजी निलंबित केले होते.बांबुळी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग खात्यातील निधी काढण्यासाठी ग्रामसेवकासोबत सरपंच यांचीही स्वाक्षरी झालेली आहे. तरीही कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालात सरपंचांना क्लीन चिट दिली होती.

त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी या चौकशीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चौकशी समितीने पारदर्शक चौकशी केली नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीची तटस्थ चौकशी होणे गरजेचे असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देवगड गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली त्रयस्थ चौकशी समिती पुन्हा नियुक्त केली होती.बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीतील १० ते १५ लाख रुपये कोणतीही विकासकामे न करता परस्पर काढण्यात आले होते. त्यामुळे या ग्राम पंचायतीमध्ये मोठ्या स्वरूपाचा आर्थिक घोटाळा झाल्याचे पुढे आले होते.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून कुडाळ गटविकास अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची चौकशी होवून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता.आंबडपालमधील त्या कारभाराची चौकशीनिलंबित ग्रामसेवक कसालकर हे बांबुळी ग्रामपंचायतीपूर्वी कुडाळ तालुक्यातीलच आंबडपाल ग्रामपंचायतीत कार्यरत होते. तेथेही त्यांनी असाच प्रताप केला होता. लाखो रुपयांची अनियमितता होती. तेथे याबाबत तक्रार झाल्यानंतर त्यांची तेथून बांबुळी येथे बदली झाली होती. मात्र, तेथील असलेली अनियमिततेची रक्कम भरण्यासाठी त्यांनी बांबुळी ग्रामपंचायतीत पुन्हा तोच प्रकार केला.

तेथील रक्कम भरली. पण देवगड समितीने या आंबडपाल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामसेवक कसालकर यांच्या कारभाराची चौकशी केली आहे. ग्रामसेवक यांनी ती रक्कम भरली असली तरी त्यांच्यावर अनियमितता केल्याचा ठपका राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीsindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी