शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

Chipi Airport Inauguration: केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचा परिणाम नाही, महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करणार: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 11:41 AM

Chipi Airport: पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू, यात कोणतीही शंका नाही, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

अनंत जाधव 

सावंतवाडी : केंद्र सरकार लोकांच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या संस्थाचा गौरवापर करत आहे. त्यांचा सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय वापर होत आहे. पण यांचा आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही आम्ही त्यांना निश्चीत सहकार्य करत राहू आणि पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू यात कोणतीही शंका नाही, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी (Balasaheb Thorat) व्यक्त केला. चिपी येथील विमानतळ उद्घाटन (Chipi Airport Inauguration) कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी लोकमतशी संवाद साधत अनेक विषयावर आपली मते माडली.यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोली चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्न कसा लवकर मार्गी लागेल या दृष्टीने माझा प्रयत्न राहिल असे ही स्पष्ट केले.

थोरात म्हणाले, गेले काहि दिवस आमच्या मंत्री आमदार यांना त्रास देण्या चा प्रयत्न केंद्रातील वेगवेगळ्या एजन्सीकडून सुरू आहे.ज्या लोकांच्या रक्षणासाठी आहेत त्याचा वापर केला जात आहे.पण यातून निषपन्न काहि होणार नाही पण ते त्रास देत आहेत.त्यांना तो देत राहूदे आम्ही आमचे काम करत राहणार आमच्या सरकारला कोणताही धोका नाही दोन वर्षे झाली आणखी तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू असा विश्वास थोरात यांनी व्यकत केला.

महाविकास आघाडी सरकावर दबाव आणण्याचा जरी हा प्रकार असला तरी आमचे मंत्री आमदार एकसंघ आहेत.त्यामुळे आम्हाला त्रास देउन काय साध्य होणार नाही आणि सिध्द ही होणार नाही नसल्याचे थोरात यांनी सांगितले.काँग्रेसने जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणूूकीत चांगली कामगिरी केली असून,भविष्यात ही अशी कामगिरी होईल कार्यकर्त्यांनी आता जोमाने काम करावे  असे आवाहन थोरात यांंनी केले आहे.

आंबोली चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्न मी समजावून घेईन मागील सरकार च्या कार्यकाळात काय झाले हे मला माहीत नाही पण आता यात नव्याने लक्ष घालून तो सोडवला जाईल त्यासाठी लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयाचा ही दौरा करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले मागील काहि दिवसात कोरोना तसेच चक्रीवादळ आदि संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्हयात आलो नाही पण पुढच्या काळात नक्की येणार असल्याचा विश्वास ही थोरात यांनी दिला.

जिल्हा बँक महाविकास आघाडीकडून लढणार

जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढली जाईल यात कोणतीही शंका नाही.आमचे जास्ती जास्त उमेदवार निवडून येतील स्थानिक पातळीवर त्यांचे काम ही सुरू झाले असून,आम्ही कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या संर्पकात असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातMahavikas Aghadiमहाविकास आघाडी