शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
2
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
3
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
4
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
5
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
6
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
7
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
8
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
9
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
10
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
11
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
12
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
13
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
14
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
15
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
16
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
17
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
18
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
19
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
20
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?

Vijaydurg Fort: लाखो रुपये खर्च करूनही विजयदुर्ग किल्ल्याची दुरावस्था!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 12:28 IST

निधीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर एका महिन्यात कारवाई करावी. अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू.

कणकवली : विजयदुर्ग किल्ला पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे अत्यंत दयनीय स्थितीत आहे. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी सन २०१४ ते २०२१ या कालावधीत ५० लाख १६ हजार रुपये खर्च करण्यात आले. मात्र हा खर्च करूनही तेथील स्थितीत काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे या निधीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर एका महिन्यात कारवाई करावी. अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन करू. तसेच केंद्रीय पर्यटनमंत्र्यांपर्यंत हा विषय पोचवून अधिकार्‍यांना शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक  सुनील घनवट यांनी दिला आहे.कणकवली येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्गातील कार्यकर्ते राजेंद्र पाटील, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या ऍड. कावेरी राणे या उपस्थित होत्या.यावेळी ऍड. कावेरी राणे म्हणाल्या,  हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीतून असे दिसून येते की ,वर्ष २०१४- २०१५ मध्ये ६७,३३८रुपये, वर्ष  २०१५-१६ मध्ये ३,५६,७१८  रुपये, वर्ष २०१६-१७ मध्ये ३,८६,०१२रुपये, वर्ष २०१७-१८ मध्ये  ७,१२,२०४ रुपये, वर्ष २०१८-१९ मध्ये १२,५१,५९८ रुपये, वर्ष २०१९-२०  मध्ये ११,७६,११३ रुपये, तर वर्ष २०२०-२१ मध्ये १०,६६,४२२रुपये खर्च करण्यात आले.म्हणजे प्रत्येक महिन्याला जवळजवळ १ लाख रुपये खर्च होऊनही किल्ल्याची एवढी दुरावस्था कशी रहाते ? पुरातत्व विभागाने हा निधी नेमके कुठे खर्च केला ? हिंदु विधीज्ञ परिषदेने वर्ष २००० पासूनचा पहाणी अहवाल मागितला असतांनाही केवळ एकाच वर्षीचा अहवाल देण्यात आला. यावरून २० वर्षांत एकदाच किल्ल्याची पहाणी करणार्‍या पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांना गड-किल्ल्यांविषयी कसलीच आस्था नाही हेच यातून दिसून येते.किल्ल्यावर राज्य शासनाचे ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ मोडकळीस आलेले एक अतिथीगृह आहे. या संदर्भात केंद्रीय पुरातत्व विभागाने पहाणी केल्यावर पुरातत्व विभागाच्या अनुमतीशिवाय किल्ल्यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे एकतर ते तोडून टाकावे अथवा राज्य सरकारने पुरातत्व विभागाकडून त्याची अनुमती घ्यावी , असे नमूद केले आहे. याचा अर्थ पुरातत्व विभाग ३० वर्षे काय करत होता?दर महिन्याला जवळजवळ १ लाख रुपयांचा निधी मिळत असतांना किल्ल्यावर झाडे-झुडपे कशी काय रहातात ? स्वछतागृहा सारख्या सुविधा का निर्माण होत नाहीत? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड