शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी बसस्थानकाची दुरावस्था, महाविकास आघाडीच्यावतीने घंटानाद आंदोलन 

By अनंत खं.जाधव | Updated: July 18, 2024 16:57 IST

आमदार केसरकर यांच्या वाढदिनी गेल्यावर्षी केले होते आंदोलन, अद्याप हीच परिस्थिती

सावंतवाडी : सावंतवाडी बसस्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याकडे सरकारचे पूर्णता दुर्लक्ष सुरू असून सरकार दरबारी प्रवाशांची भावना पोचावी म्हणून आज, गुरूवारी महाविकास आघाडीच्यावतीने बसस्थानकावर घंटानाद आंदोलन छेडले. मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना प्रवाशांच्या भावना कळाव्यात म्हणून हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. एसटी प्रवाशांना अशी वागणूक मिळत असेल तर नवनवीन योजना कशासाठी असा सवाल यावेळी करण्यात आला.  साळगावकर म्हणाले, बस स्थानक दुरावस्थेबाबत आमदार केसरकर यांच्या वाढदिनी गेल्यावर्षी आंदोलन केलं होते. तेव्हा कुणाच्या वाढदिनी आंदोलन करू नये अशी आमची कुच्छीतपणे चेष्टा केली होती. मात्र, वर्षभरात इथली परिस्थिती काही बदलेली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना जाग यावी, प्रवाशांच्या वेदना कळाव्यात यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. परिस्थिती बदलत नसल्यानं आमदार बदलायचाय असेही साळगावकर यांनी सांगितले.गेल्या अडीच वर्षांत जिल्ह्यातील एकही मंत्री जनतेची कामं करू शकला नाही. हे सरकार निष्क्रिय सरकार म्हणूनच ओळखले जात आहे. स्वतःची तुंबडी भराण्यासाठी मंत्री काम करत आहेत असा टोला जिल्ह्यातील महायुतीच्या मंत्र्यांना साळगावकर यांनी लगावला.राऊळ म्हणाले, भुमिपूजन होऊन सात वर्षे उलटून गेली हे बसस्थानक विकसीत झाले नाही. विकासापासून हा मतदारसंघ वंचित राहिला आहे. त्यामुळे येणारा आमदार हा इंडिया आघाडीचा असेल, प्रत्येक पक्षाला मागणी करण्याचा अधिकार आहे. दरम्यान, पोलिसांकडून नोटीसा देऊन हे शांततेत सुरू असणारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यानं यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.या आंदोलनात उध्दव सेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका पुंडलिक दळवी, मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार, बाळा गावडे,  देवेंद्र टेमकर, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत, शिवदत्त घोगळे, सावली पाटकर, सायली दुभाषी, रश्मी माळवदे, अफरोज राजगुरू आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर agitationआंदोलन