शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

बबनराव मी तुमच्यासोबतच, रोजगारावरून खासदार राऊत व साळगावकर यांचे सुरात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:02 AM

नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणे कदापि शक्य नाही. पण जिल्ह्यात प्रकल्प आले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. बेरोजगारी वाढत आहे, हे चांगले नाही.

सावंतवाडी : नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणे कदापि शक्य नाही. पण जिल्ह्यात प्रकल्प आले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. बेरोजगारी वाढत आहे, हे चांगले नाही. त्यामुळे प्रकल्प यावेत या मताशी मी सहमत आहे, असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या सुरात सूर मिळवला. तसेच प्रकल्पासाठी मी स्वत: प्रयत्न करेन असे म्हणत, बबनराव, मी तुमच्यासोबतच अशी कोपरखळी मारत खासदार निधीतून नगरपालिकेला १५ लाखांचा निधी जाहीर केला.खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली . त्यांचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले. यावेळी मुख्याधिकारी राहुल इंगळे, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,  राजू नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, बाबू कुडतरकर, सागर नाणोस्कर आदी उपस्थित होते.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कंत्राटी कामगारांना कायम करा या मागणीचा पाठपुरावा करा, अशी विनंती खासदार राऊत यांच्याकडे केली. त्यावर राऊत यांनी तुमचा प्रश्न चांगला आहे. नक्की पाठपुरावा करू, असे सांगितले. तर नगराध्यक्षांनी जिल्ह्यात रोजगार आला पाहिजे. सगळ्याच प्रकल्पांना विरोध नको, अशी भूमिका मांडली. त्यावर खासदार राऊत यांनी आम्ही नाणार प्रकल्पाला कशासाठी विरोध करतो हे साळगावकर यांना पटवून दिले.तुम्ही रोजगार म्हणत असाल तर नाणारमधून रोजगार निर्मिती होईल. पण ती किती आणि स्थानिक त्यात किती असतील याचा विचार करा. देशात दोन ठिकाणी रिफायनरी आहे. तेथेही मी जाऊन आलो. तर तेथे रोजगार करणारे स्थानिक नाहीत तर ते बाहेरचे आहेत. तुम्हाला कोकणात बाहेरचे येऊन रोजगार करणारे चालतील का? असा सवाल करत प्रकल्प आले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. पण ते कोणते प्रकल्प यावेत यालाही मर्यादा आहे. रोजगारासाठी मी तुमच्याबरोबरच आहे. येथील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या मताशी सहमत असून रोजगार आम्ही उपलब्ध केला नाही तर आम्हाला पुढील पिढी माफ करणार नाही, असे सांगत प्रकल्प यावेत, असे सांगत साळगावकर यांच्या सुरात राऊत यांनी सूर मिळवत रोजगारासाठी काय तरी केले पाहिजे, असेही सांगितले. तसेच नगरपालिकेचे काम खरोखरच चांगले आहे. मला कायम नगरपालिकेबद्दल अभिमान आहे. बबनराव मी तुमच्या सोबतच, असे म्हणत खासदार राऊत यांनी आपल्या खासदार निधीतून पालिकेला पंधरा लाखाचा निधीही जाहीर केला. तसेच नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक हे चांगले काम करीत आहेत, असे सांगत अभिनंदनही त्यांनी यावेळी केले.महामार्ग सावंतवाडीतून गेला पाहिजे होताझाराप-पत्रादेवी हा महामार्ग सावंतवाडीतून गेला पाहिजे होता. त्यामुळे रोजगार निर्मिती झाली असती, असे सांगत सावंतवाडीचे दु:ख आम्ही जाणून आहोत. त्यामुळेच कणकवलीवासियांना शहरातून महामार्ग कसा जाईल हे बघा, अशी सूचना केल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत