शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी प्रबोधन गरजेचे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:48 IST

सर्वसामान्य ग्राहक अन्याय होत असताना तक्रार करून काय होणार ? अशी मानसिकता बाळगतो आणि याकरीता प्रबोधन होणे तसेच ग्राहकाला सजग करणे गरजेचे.

कणकवली : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ग्राहकांची अनेकवेळा फसवणूक होत असते. त्याकरता ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. तसेच ग्राहक प्रबोधनात कार्यशाळेचे महत्वपूर्ण योगदान आहे. असे प्रतिपादन कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले.ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या एक दिवसीय कोकण विभागीय ग्राहक प्रबोधन  कार्यशाळा कणकवली येथील महाराजा सभागृहात आज, गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड होते.यावेळी वैशाली राजमाने म्हणाल्या, सर्वसामान्य ग्राहक अन्याय होत असताना तक्रार करून काय होणार ? अशी मानसिकता बाळगतो आणि याकरीता प्रबोधन होणे तसेच ग्राहकाला सजग करणे हे कार्य या कार्यशाळेच्या माध्यमातून होणार आहे. फक्त ग्राहकाने सक्षमता दाखवीत मानसिकता बदलली तर निकोप समाजाभिमुख ग्राहक चळवळीला बळ मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या ग्राहक प्रबोधन कार्यशाळेमध्ये राज्याचे सचिव अरुण वाघमारे, वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य संघटक सर्जेराव जाधव तसेच जिल्हा ग्राहक मंचचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल आणि कोकण विभागाचे अध्यक्ष प्रा.एस .एन. पाटील यांनी ग्राहक संबंधी विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तहसीलदार रमेश पवार, ग्राहक पंचायतचे राज्य सचिव  अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, ग्राहक मंच सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल, कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा संघटक दादा कुडतरकर, कणकवली तालुकाध्यक्ष नामदेव जाधव, सचिव महानंद चव्हाण, श्रद्धा कदम, अशोक करंबेळकर, प्रसिद्धी माध्यम समन्वयक विजय गावकर, रवींद्र मुसळे, डॉ. विठ्ठल गाड आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग