शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्ट महिना ठरला साथीचा महिना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्याचे थैमान 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 2, 2023 12:36 IST

एका महिन्यात आढळले ३१४ डेंग्यू बाधित रुग्ण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या साथीने थैमान घातले आहे. ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे रुग्ण सापडले असल्याने ऑगस्ट महिना साथींचा महिना ठरला आहे. एका ऑगस्ट महिन्यात तब्बल ३१४ डेंग्यूचे, १९ मलेरियाचे आणि ३० चिकनगुण्याचे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात जस जसा पावसाचा जोर कमी झाला तसा अन्य साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. जिल्ह्यातील विविध भागात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्यासारखे रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक रुग्ण हे डेंग्यू बाधित आढळले आहेत. त्यापाठोपाठ चिकनगुण्या आणि मलेरिया रुग्णांचा समावेश आहे. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत त्या भागात आरोग्य यंत्रणा सतर्क असून संशयित रुग्णाचे रक्त नमुने घेण्यात येत आहेत. शिवाय त्या भागात स्वच्छता मोहीमही राबविली जात आहेत. जिल्ह्यात सापडलेले सर्व रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.

ऑगस्ट मध्ये आढळले तब्बल ३१४ डेंग्यू बाधित रुग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जानेवारी ते आतापर्यंत ३४५ डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले आहे. यातील तब्बल ३१४ रुग्ण हे केवळ एका ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत. तर आतापर्यंत १८८१ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून यातील १४२८ नमुने हे एका ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेले आहेत.गेल्या महिन्यात ३० रुग्ण चिकनगुण्याचेजिल्ह्यात आतापर्यंत ४५ चिकनगुण्याचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील १५ रुग्ण हे जानेवारी ते जुलै महिन्यातील आहेत. तर तब्बल ३० रुग्ण हे एका ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत.

मलेरिया रुग्णातही वाढ

डेंग्यू, चिकनगुण्या पाठोपाठ मलेरिया च्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत २९ मलेरियाचे रुग्ण आढळले असून यात ऑगस्ट महिन्यातील १९ रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdengueडेंग्यूMalariaमलेरिया