शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक पदी अतुल काळसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 17:38 IST

Bjp Sindhudurg : २०२४ साली निवडणुका होणाऱ्या महाराष्ट्रातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी प्रदेश भाजपाने 'समर्थ बूथ अभियान' ची सुरूवात केली आहे.  रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समर्थ बूथ अभियानाचे समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक पदी अतुल काळसेकर 'समर्थ बूथ अभियान'अंतर्गत नियुक्ती

कणकवली : २०२४ साली निवडणुका होणाऱ्या महाराष्ट्रातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी प्रदेश भाजपाने 'समर्थ बूथ अभियान' ची सुरूवात केली आहे.  रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समर्थ बूथ अभियानाचे समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

६ जुलै ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या अभियानात राज्यातील ९३ हजार बुथची रचना पूर्ण किंवा पुनर्गठीत होणार आहे. यासाठी पक्षातील अनुभवी आणि संघटन कौशल्य असलेल्या पदाधिकाऱ्यांना एकेका लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे.सिंधुदुर्गातील अनेक निवडणुकींचा अनुभव आणि संघटन कौशल्याची खुबी असलेल्या अतुल काळसेकर यांना या लोकसभेच्या सहाही विधानसभेतील १९३५ बुथची रचना पूर्ण करावयाची आहे. त्या अनुषगाणे सिंधुदुर्गातील कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. कणकवली येथे प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली,आमदार नितेश राणे,संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,संघटन सरचिटणीस जयदेव कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा बैठकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभेतील बूथ रचना पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बूथ रचना संयोजक महेश सारंग यांच्या नियोजनातून जिल्ह्यातील शक्तिकेंद्र आणि बुथवरील बैठका सुरू झाल्या आहेत.गेल्या अनेक निवडणुकामध्ये रत्नागिरी -सिंधुदुर्ग(पूर्वीचा राजापूर) हा मतदार संघ शिवसेना भाजपाच्या मदतीने जिंकत आलेली आहे.युतीच्या बंधनात या ठिकाणी स्वबळावर लढायची संधी भाजपाला आजवर मिळालेली नाही. यावेळी निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याचीही संधी भाजपाला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाने मतदारसंघात भाजपाची ताकद वाढलेली असून पूर्वीचा पारंपरिक भाजपा मतदार आणि राणेंसोबत भाजपाच्या प्रवाहात सामील झालेले मतदार यांची संख्या सहज साडे चार लाखांपर्यंत जाते. जी विजयासाठी आवश्यक मानली जात आहे. यासाठी प्रत्येक बुथवरील पक्षाचे संघटन मजबूत करणे ही मोठी जबाबदारी आहे.

प्रत्येक बुथवर किमान ३० जणांची समिती गठीत करण्यात येणार असून त्यात युवा,महिला तसेच सर्व सामाजिक घटकांना सामावून घेण्यात येणार आहे.या लोकसभा मतदार संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ९१६ बूथ तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन मतदारसंघात १०१९ बूथ आहेत.या बूथ रचनेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक समन्वयक नियुक्त केलेला असून खाली मंडलस्तर आणि शक्तिकेंद्र स्तरापर्यंत विस्तारक नेमलेले आहेत.

या अभियानात नारायण राणे,रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सचिव प्रमोद जठार,निलेश राणे,जेष्ठ नेते बाळ माने,आमदार नितेश राणे,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन या सहकाऱ्यांसह आणि लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिधी यांच्या सहभागाने लोकसभा समन्वयक अतुल काळसेकर हे अभियान शंभर टक्के यशस्वी करणार असल्याची माहिती जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.पंतप्रधान साधणार राज्यातील बूथ अध्यक्षांशी संवाद !या अभियानाच्या काल निश्चितीला एक वेगळे महत्व आहे.६ जुलै हा जनसंघाचे पहिले अध्यक्ष डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिवस आहे तर १७ सप्टेंबर हा पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस आहे. १७ सप्टेंबर या अभियान समाप्ती दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील सुमारे ९३ हजार बूथ अध्यक्षांशी थेट संवाद साधणार आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAtul Kalasekarअतुल काळसेकरsindhudurgसिंधुदुर्ग