शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भात खरेदी तातडीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

By admin | Updated: May 20, 2015 23:58 IST

विनायक राऊत, वैभव नाईक : पावसाळा तोंडावर, शेतकरी अडचणीत

सिंधुदुर्गनगरी : पावसाळा तोंडावर आला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी न झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे तत्काळ भात खरेदी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी येत्या चार दिवसात कुडाळ व इतर शासकीय गोदामे ताब्यात घेऊन भात खरेदी तातडीने करतो, असे आश्वासन दिल्याची माहिती खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदी तत्काळ सुरु करावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत खासदार राऊत व आमदार वैभव नाईक बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाध्यक्ष सुरेश शिरसाट, नागेंद्र परब व अन्य उपस्थित होते.यावेळी खासदार राऊत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील या हंगामातील शेतकऱ्यांकडील भात खरेदी न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेती बागायतदारांचे झालेले नुकसान व दुसरीकडे शेतात पिकलेले भात घरात पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे नित्याचे खर्च भागविणे मुश्किल झालेले आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोजात भरडला जाण्याची शक्यता आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ही वस्तुस्थिती लक्षात घेता या जिल्ह्यातील अन्य कोणत्याही शेतकऱ्यावर अशी पाळी येवू नये म्हणून तत्काळ शेतकऱ्यांकडील भात खरेदी होणे आवश्यक आहे. या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता कुडाळ व इतर शासकीय गोदामे ताब्यात घेऊन तातडीने भात खरेदी केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सरकारवर टीका करत आता कुठे गेले अच्छे दिन? असे सांगत आरोप केला होता.याबाबत खासदार राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मोदी सरकारने एक वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी कामे केली. स्वातंत्र्यकाळानंतर आजपर्यंत हजारो कायद्यांचा उपयोग होत नाही हे लक्षात येताच आतापर्यंत मोदी सरकारने दोन विधेयके आणून तब्बल ३५०० कायदे कालबाह्य केले. त्यामुळे लोकांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान विमा योजना लागू केली. तसेच पूर्वी अवकाळी पाऊस किंवा कोरडा दुष्काळ पडला तर ५० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळत होती.आता तर ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत लागू करण्याचा निर्णय झाला असून तसा सर्व्हेही करायला सुरुवात झाली आहे. यासारखी अनेक लोकाभिमुख कामे मोदी सरकारने केल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली. (प्रतिनिधी)आंबा उत्पादकांचे कर्ज माफ करावेअवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील शेकडो आंबा उत्पादकांचे कोट्यवधी रुपये नुकसान झाले आहे. आंबा उत्पादनासाठी सोसायटी व बँकांकडून घेतलेले कोट्यवधी रुपये शासनाने माफ करावे अशी मागणी शासनाकडे केली आहे.तलाठ्यांचा संप आज मिटणार ?आचऱ्याचे मंडल अधिकारी मुंबरकर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी १६ मे पासून जिल्ह्यात तलाठ्यांनी रजा आंदोलन पुकारले आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, तलाठ्यांचा संप मिटण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात असून, आजच्या आज संप मिटेल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.चार दिवसात निर्णय?वाळू प्रश्न हरित लवादाकडे प्रलंबित असल्याने येत्या चार दिवसात याप्रकरणी निर्णय होण्याची शक्यता खासदार विनायक राऊत यांनी वर्तविली आहे.