शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पाच वर्षांपूर्वी हरवलेल्या आसामच्या मनोरुग्णाची आईशी पुनर्भेट, संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे साहाय्य

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 17, 2024 15:00 IST

संतोष पाटणकर खारेपाटण : पाच वर्षांपूर्वी मानसिक स्थिती बिघडलेली असताना, आसाम या राज्यातील दातुरी या छोट्याशा खेड्यातील सनुराम दास ...

संतोष पाटणकरखारेपाटण : पाच वर्षांपूर्वी मानसिक स्थिती बिघडलेली असताना, आसाम या राज्यातील दातुरी या छोट्याशा खेड्यातील सनुराम दास हा घरातून बाहेर पडला आणि तो थेट पोहोचला हजारो किलोमीटर दूर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातून या अनोळखी युवकाला आजारातून बरे झाल्यानंतर पुनर्वसनासाठी ६ सप्टेंबर २०२१ रोजी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल करण्यात आले.संविता आश्रमातील सेवा कार्यकर्त्यांच्या उपचाराने व मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. धुरी यांच्या मानसोपचाराने सनुराम हळूहळू बरा झाला. त्याने मार्च २०२४ मध्ये जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांना त्याच्या आसाममधील गावाची माहिती दिली. त्यांनी गुगलद्वारे सनुरामच्या मु. दातुरी, ता. बिजनी जि. चिरांग या गावाचा शोध घेऊन संपर्क केला.

माणुसकीच्या दृष्टीने सनुरामच्या आईला त्यांच्या हरवलेल्या मुलाचा शोध लागल्याची आनंदाची बातमी दिली. इतकेच नाही, तर या गरीब मजूर महिलेच्या मुलाला घरी परतण्यासाठी, त्याला त्याच्या आईच्या ताब्यासाठी आवश्यक सारी व्यवस्था केली. संविता आश्रमातील सोशल वर्कर माधव पाटील यांनी सनुरामला रेल्वेने आसामला त्याचे गाव दातुरी येथे नेऊन आई व लेकराची पुनर्भेट घडवून आणली. एकुलता एक सनुराम मनोरुग्णावस्थेत घरातून निघून गेल्याच्या घटनेनंतर आई जयंती दासचे सारे जीवनच दुःखाने भरून गेले होते. त्या त्यांचे राहते घर सोडून मुलीच्या घरी राहत होत्या.जयंती आणि सनुराम या मायलेकरांची तब्बल पाच वर्षांनी जेव्हा पुनर्भेट झाली, तेव्हा या भेटीचे साक्षीदार असलेल्या समस्त दातुरी ग्रामस्थांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू ओघळले. सनुरामची आई जयंती दास यांनी आभार मानले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग