शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

आशा वर्कर्स युनियनचा मोर्चा, मागण्यांकडे शासनाचे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:04 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करा, दरमहा १८ हजार वेतन द्या यासह अन्य २५ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा परिषद भवनावर भव्य मोर्चा काढला.

ठळक मुद्दे आशा वर्कर्स युनियनचा मोर्चा, मागण्यांकडे शासनाचे वेधले लक्ष एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ताच्या घोषणा

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करा, दरमहा १८ हजार वेतन द्या यासह अन्य २५ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा परिषद भवनावर भव्य मोर्चा काढला.

एक रूपयाचा कढीपत्ता...सरकार झाले बेपत्ता यासह लक्षवेधी व एका पेक्षा एक सरस सरकार विरोधी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आपल्या विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा अर्चना धुरी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी सचिव विजयाराणी पाटील, खजिनदार निलीमा लाड, प्रियांका तावडे, नम्रता वळंजू, विद्या सावंत, वर्षा परब यासह विविध पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रखरखत्या उन्हात देखील आपल्या न्याय मागण्यांसाठी महिला आक्रमक पवित्र्यात दिसत होत्या.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण धोरण बंद करा, आशांना एएनएम पदावर बढती द्या, ५ हजार दिवाळी भेट द्या, मिटिंगसाठी प्रवास खर्च व भत्ता मिळावा, कुटुंब नियोजन लाभार्थी भत्ता १५० वरून ३०० रुपये करावा, आशांना सायकली पुरविण्यात याव्यात, केरळ व इतर राज्यांप्रमाणे आशा व गटप्रवर्तक यांना सेवासुविधांचा लाभ मिळावा यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.दरम्यान, आशा व गटप्रवर्तकांच्या वरील मागण्यांबाबत मंत्र्यांशी वेळोवेळी चर्चा झाली. आश्वासन मिळाली. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. लवकरात लवकर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा पावसाळी अधिवेशनात आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्सच्यावतीने ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हा परिषद भवन असा मोर्चा काढला.

टॅग्स :Morchaमोर्चाsindhudurgसिंधुदुर्ग