शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आशा स्वयंसेविकांना लोकसभा निवडणूक कामाचा भत्ता तत्काळ द्या, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनची मागणी

By सुधीर राणे | Updated: May 9, 2024 13:10 IST

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन ; सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने मागणी

कणकवली: जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना लोकसभा निवडणूक कामाचा भत्ता तत्काळ देण्यात यावा.अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा कॉ. प्रियांका तावडे व सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी दिली.पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका यांनी लोकसभा निवडणुकीत ७ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायं ६ वाजेपर्यंत आपापल्या भागातील मतदान केंद्रावर औषधाच्या किटसह उपस्थित राहून आरोग्यविषयक तातडीची सेवा पुरवलेली आहे. पण निवडणूक कामकाजाचा भत्ता जिल्ह्यातील सर्वच आशांना देण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर हा भत्ता पूर्ण देण्यात आला, तर काही ठिकाणी निम्मा किंवा निम्म्याहून कमी देण्यात आलेला आहे.बऱ्याच ठिकाणी भत्ता अजिबातच देण्यात आलेला नाही.  लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडलेल्या शासकीय, निमशासकीय कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी,  शिपाई, स्वयंसेवक आदी सर्वांना नियमानुसार भत्ता देण्यात आला आहे. तसेच निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनाने शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनामधील कामगार, कर्मचाऱ्यांना मताधिकार बजावण्यासाठी सुट्टी जाहीर केलेली होती. पण हेच कर्तव्य पार पाडलेल्या बऱ्याच आशा वर्कर्सना मोबदला मिळालेला नाही, ही नक्कीच आशांच्यावर अन्याय करणारी बाब आहे. ज्यांना पूर्ण भत्ता मिळाला नाही व ज्यांना अजिबातच भत्ता मिळाला नाही, अशा सर्व आशानी फोन द्वारे संघटनेकडे तक्रारी नोंद करून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. प्रशासनाची ही कृती एकच व सारखेच काम केलेल्या आशा कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण करणारी व त्यांच्या मानसन्मानाला तडा देणारी आहे. ज्या आशांना निम्मा किंवा निम्म्यापेक्षा कमी भत्ता मिळाला व बऱ्याच आशांना पूर्ण भत्ताच मिळाला नाही, याविषयी आपण निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून त्यांना योग्य व सन्मानजनक भत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करवा.अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४