शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

'ते' पक्षात आले म्हणून नगरपालिका निवडणूक जिंकणार असे नाही - राजन तेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 18:15 IST

निवडणूका आल्या की येथील आमदार उगवतात आणि नंतर कोणाला दिसत नाहीत. फक्त घोषणाबाज आमदार झाले असून त्यांनी दिलेली किती आश्वासने पाळली ते सांगावे असे आव्हान तेली यांनी दिले.

सावंतवाडी : भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.त्यामुळे कोण नव्याने पक्षात आले तर पक्षाची ताकद वाढत असते. मात्र त्यांनी जनतेत जाऊन पहिले काम केले पाहिजे असे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले. तसेच युवराज लखम सावंत भोसले पक्षात आले म्हणून नगरपालिका निवडणूक जिंकणार असे नाही, ते आले नसते तरी निवडणूका पक्ष जिंकणारच होता असेही तेली म्हणाले. ते बुधवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.तेली म्हणाले, कुडाळ येथील महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात सत्ताधारी आमदार पाच लाख मागितल्याचा दावा करतात. दुसरीकडे सावंतवाडी महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करतात. मात्र त्यानंतर काहीच बोलत नाहीत. त्यामुळे नंतर त्यांच्याशी तडजोड करतात की काय? असा सवाल तेली यांनी केला. जिकडे तिकडे अवैध धंदे सुरू आहेत. पोलीस व महसूल यंत्रणेचा पूर्ता दुर्लक्ष आहे. वेत्ये येथील दगड खाणीमुळे भविष्यात अपघात होऊ शकतो असा आरोप त्यांनी यावेळी केला.कोणी आले म्हणून पक्ष मोठा होत नसतोभाजपमध्ये युवराज लखम सावंत-भोसले यांनी प्रवेश केला. याबाबत तेली यांना विचारले असता ते म्हणाले, पक्षात येणाऱ्या सर्वांचा सन्मान केला जाईल. कोणी घराणे आले म्हणून पक्ष मोठा होत नसतो. पक्ष हा  संघटना आणि शिस्त यावर मोठा होतो. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष असून पक्षशिस्त सर्वांनाच पाळावी लागेल. लखम सावंत-भोसले आले याचा आम्हाला आनंद आहे. मात्र ते आले नसते तरी सावंतवाडी नगरपालिकेत भाजपचीच सत्ता आली असती असा दावाही तेली यांनी केला.फक्त घोषणाबाज आमदारनिवडणूका आल्या की येथील आमदार उगवतात आणि नंतर कोणाला दिसत नाहीत. फक्त घोषणाबाज आमदार झाले असून त्यांनी दिलेली किती आश्वासने पाळली ते सांगावे असे आव्हान तेली यांनी दिले.या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष संजू परब, महेश सारंग, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, अजय गोंधावळे, सत्यवान बांदेकर, महेश धुरी, बाळा पालेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणRajan Teliराजन तेली