शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाच्या कालव्यांचे काम बंद पाडले?, प्रकल्पग्रस्तांकडून दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:25 IST

प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअरुणाच्या कालव्यांचे काम बंद पाडले?, प्रकल्पग्रस्तांकडून दावापाटबंधारे अधिकाऱ्यांनी केला इन्कार; काम सुरूच राहणार : राजन डवरी

वैभववाडी : प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.अरुणा प्रकल्पबाधित काही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत प्रकल्पाचे काम करू देणार नाही अशी भूमिका घेतली असून या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनाशी लढा सुरू आहे. दरम्यान, अरुणा प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा केली होती.त्यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांची सभा घेण्याचे मान्य केले होते. दोन तारखांना निश्चित केलेल्या सभा रद्द झाल्यामुळे बुधवारी सुरेश नागप, तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, श्रीराम बांद्रे, सूर्यकांत नागप, विलास कदम, वामन बांद्रे, संदीप बांद्रे, पंकज कांबळे आदी प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या उजवा आणि डाव्या कालव्यांचे सुरू असलेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच भुईबावडा येथील मुख्य कालव्याचे काम बंद पाडल्याचा दावाही माध्यमांकडे केला.मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात : तानाजी कांबळेआम्हांला न्याय मिळत नसल्यामुळे कोणतेही काम करू नये, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे आम्ही उजव्या आणि डाव्या कालव्याचे काम बंद पाडले. सायंकाळी पोलीस बंदोबस्तात काम सुरू केल्याचे समजले. जर पोलीस काम सुरू करीत असतील तर आमच्या मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात. अन्यथा आमच्या मागण्यांसाठी आम्हांला पोलीस ठाण्यात जाऊन बसावे लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी दिला आहे.अरुणा प्रकल्पाचे कोणतेही काम कुणी बंद करण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम लवकरात पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे कुणी काम बंद करण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही काम बंद ठेवणार नाही. वेळेत काम पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे कालव्याचे काम आम्ही सुरूच ठेवले आहे, असे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले. तर काही लोक काम बंद करण्यास सांगत होते. मात्र, कालव्यांचे काम दिवसभर सुरू होते. उद्याही सुरुच राहील असे, सहाय्यक अभियंता संदीप दावणे यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग