शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे शुक्रवारी आंदोलन, पुनर्वसन उपायुक्तांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:16 IST

अरुणा प्रकल्पाच्या घळभरणीला आक्षेप असलेल्या प्रकल्पग्रस्तांची स्थानिक प्रशासनाकडून निराशा झाल्याने त्यांनी आता आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे.

ठळक मुद्देअरुणा प्रकल्पग्रस्तांचे शुक्रवारी आंदोलन, पुनर्वसन उपायुक्तांची घेतली भेटत्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या भूमिकेवर ठाम

वैभववाडी : अरुणा प्रकल्पाच्या घळभरणीला आक्षेप असलेल्या प्रकल्पग्रस्तांची स्थानिक प्रशासनाकडून निराशा झाल्याने त्यांनी आता आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे. शुक्रवारी प्रकल्पग्रस्त आयुक्त कार्यालयासमोर दे धडक, बेधडक आंदोलन छेडणार आहेत. जोपर्यंत घळभरणीला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही; तोपर्यंत अशा पध्दतीने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार पुनर्वसन उपायुक्तांच्या भेटीत निवेदनाद्वारे प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.नियोजित आंदोलनाच्या अनुषंगाने पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अरुण अभंग यांची अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने भेट घेत त्यांना आंदोलनासंबंधी निवेदनाद्वारे पूर्वकल्पना दिली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, माजी सरपंच सुरेश नागप, सूर्यकांत नागप, विनेश नागप, तुकाराम नागप, शांताराम नागप, संतोष नागप आदी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेताच अरुणा प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली.

या धरणाच्या पाण्यात अनेक घरे बुडाली. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीवर ठाम राहत गेले चार महिने काही प्रकल्पग्रस्त विविध प्रकारची आंदोलन छेडत आहेत. पालकमंत्र्यांचे ते आश्वासन हवेत विरून गेले.प्रकल्पस्थळ, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडल्यानंतर पालकमंत्र्यांनी गणेशोत्सवापूर्वी जलसंपदा मंत्र्यांसोबत पुनर्वसन गावठाणात बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासनही हवेत विरून गेल्याने प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांनी आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे.

येत्या शुक्रवारी आयुक्त कार्यालयामध्ये विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ही संधी साधत त्या बैठकीला जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्याच दिवशी आंदोलन छेडण्याचा प्रकल्पग्रस्तांनी निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग