शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कपड्यांचा शोरुम फोडणारे अटक, कणकवलीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:19 IST

कणकवली शहरातील पीटर इंग्लंड या कपड्यांच्या शोरुममधील चोरीतील पाच संशयित आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी तेथील एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्या पाचही संशयितांना कणकवली पोलिसांच्या पथकाने राजापूर पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे कपड्यांचा शोरुम फोडणारे अटक, कणकवलीतील घटना पाच जणांना पोलीस कोठडी

कणकवली : कणकवली शहरातील पीटर इंग्लंड या कपड्यांच्या शोरुममधील चोरीतील पाच संशयित आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी तेथील एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्या पाचही संशयितांना कणकवली पोलिसांच्या पथकाने राजापूर पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. गुरुवारी त्यांना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले असता १२ फेब्रुवारीपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.कणकवलीतील पीटर इंग्लंड या शोरुमचे शटर उचकटून रोख १५ हजार रुपये व कपड्यांसह सुमारे एक लाखाचा मुद्देमाल २१ जानेवारीला पहाटे चोरीला गेला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असतानाच रत्नागिरी पोलिसांनी पाच संशयितांना मुंब्रा येथून अटक केली होती.या अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये मोहमद्द इरफान कुडूस शेख (१९ , रा. शिळफाटा - ठाणे), रिझवान अहमद मकबुल खान (२७, शिळगाव, ठाणे), मुमताज मेहराज शेख (२०, शिळफाटा - ठाणे), एजाज अली शफात अली सिद्दीकी (२५, ठाकुरपाडा-ठाणे), मुश्ताक महारुख खान (३४, रा. मुंब्रा) यांचा समावेश आहे.संशयितांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडून अटक वॉरंट घेत कणकवली पोलिसांचे पथक राजापूर येथे बुधवारी गेले होते. गुरुवारी त्या पाचजणांना कणकवलीत आणण्यात आले.त्यांच्याजवळ पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी पीटर इंग्लंड या शोरुममध्ये चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले.या चोरी प्रकरणात वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली असून ती राजापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. तर पीटर इंग्लंड शोरुममधील काही कपडेही या चोरट्यांकडे मिळाले होते. तेही पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदीश बांगर करीत आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग