शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: आरोंदा तेरेखोल खाडी परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र उभारणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 12:20 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोंदा येथे पर्यटनाला अतिशय सुंदर जागा

सावंतवाडी : आरोंदा तेरेखोल खाडी परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन उभे केले जाणार आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी  दिली. तसेच तेरेखोल खाडीपात्रात होणारी अवैद्य वाळू उपसा रोखण्यासाठी उपायोजना आखण्यात येणार आहे तशा सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून जमिनीची धूप रोखण्यासाठी संरक्षण भिती उभारण्यात येणार असल्याचेही मंत्री केसरकर म्हणाले.मंत्री केसरकर यांनी बुधवारी आरोंदा तळवणे सातार्डा किनळे रेडी येथील सरपंचांना सोबत घेऊन खाडी किनारपट्टी भागाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोंदा येथे पर्यटनाला अतिशय सुंदर जागा आहे आमदार होण्याच्या आधीपासून आपण या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहे कोट्यावधीचा निधी उपलब्ध करुन दिला होता मात्र काही अडचणीमुळे पर्यटन होऊ शकले नाही.मात्र आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन होण्यासाठी माझे प्रयत्न राहील त्यासाठी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात येणार आहे.या भागाचा पर्यटन दृष्ट्या विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार आहेत. लवकरच यासाठी पाऊले उचलली जाणार असून आवश्यक सुचना संबधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.आरोंदा ते सातार्डा या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. त्यामुळेच किनारपट्टी भागातील जमिनीची धूप होऊन माड बागायती उद्वस्त होत आहेत ही वाळू उपसा रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना आखण्यात येणार आहेत. शिवाय किनाऱ्यावर संरक्षण भिंत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विकास होतांना स्थानिकांचे तसेच अधिकाऱ्यांकडून सहकार्य आवश्यक असते त्यामुळे सरपंचांना घेऊन आपण या भागाची पाहणी केली. त्यामुळे आपल्याला विश्वास आहे की ज्या पध्दतीचे पर्यटन जिल्ह्यात आणू इच्छीतो ते पर्यटन येथे आणून जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर पोहचवू असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनDeepak Kesarkarदीपक केसरकर