शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा महामंडळाचे आणखी एक प्रशिक्षण केंद्र सावंतवाडीत होणार, पोलिस महासंचालकाची माहिती

By अनंत खं.जाधव | Updated: October 2, 2024 00:04 IST

Sawantwadi News: सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असून,आणखी एक शंभर जणांची व्यवस्था असणारे सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी आठ कोटिचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे.

- अनंत जाधव सावंतवाडी - सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असून,आणखी एक शंभर जणांची व्यवस्था असणारे सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी आठ कोटिचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याला लवकरच मान्यता देणार आहे.तसेच या निधीतून उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील अशी माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तथा महाव्यवस्थापकीय संचालक सुरक्षा महामंडळ बिपीन कुमार सिंग यांनी ऑनलाईन लोकमत शी बोलतना दिली आहे.

महासंचालक बिपीन कुमार सिंग हे मंगळवारी सावंतवाडीत आले होते.यावेळी त्यांनी पोलिस परेड मैदानावर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या प्रशिक्षण केंद्राची पाहाणी केली तसेच केंद्राची काहि कामे अपूर्ण आहेत.याबाबत त्यांनी बांधकाम विभागा च्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व उद्घाटनापुर्वी राहिलेली कामे पूर्ण करा असे निर्देश दिले.यात पाण्याची व्यवस्था विद्युत पुरवठा आदि कामाचा समावेश आहे.

याबाबत महासंचालक बिपीनकुमार सिंग यांना विचारले असता त्यांनी सावंतवाडीतील प्रशिक्षण केंद्र हे चांगले झाले आहे. पण इमारतीतील काहि कामे पूर्ण होणे बाकी ती कामे पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन करण्यात येईल.या ठिकाणी 120 सुरक्षा बलाचे कर्मचारी थांबणार आहेत.त्यांना सर्व सुविधा देण्यात येणार आहेत हे प्रशिक्षण केंद्र सुसज्ज होणार आहे.या व्यतिरिक्त आणखी एक सुरक्षा बलाची इमारत उभी राहणार आहे यासाठी सहा कोटि रूपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा प्रस्ताव महामंडळाला पाठविण्यात आला आहे.ती इमारत आता च्या इमारती च्या बाजूलाच उभी राहणार असून या ठिकाणी 100 ते 120 प्रशिक्षणार्थी थांबतील एकूण दोनशे ते अडीचशे जणांचे वास्तव्य येथे असणार आहे.असे सिंग यांनी स्पष्ट केले.

तसेच पोलिस परेड मैदान हे सुरक्षा बलाला सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून या मैदानाला सुरक्षित करण्यात येणार असल्याचे ही सिंग यांनी सांगितले.दरम्यान सिंग यांनी भेट दिल्यानंतर त्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रूषिकेश रावले यांनी स्वागत केले यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण सुरक्षा बलाचे अकाराम राणे निलेश पाटील उपविभागीय अभियंता सागर सगरे विजय चव्हाण ठेकेदार दया परब व नार्वेकर उपस्थित होते.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीPoliceपोलिस