शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णमूर्ती विसर्जनाची आगळी वेगळी पद्धत, कुठं अन् नेमकी काय आहे ही प्रथा? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:46 IST

कृष्ण आपल्याला ओलांडून गेला की तो आपले रक्षण करतो, अशी श्रद्धा इथल्या ग्रामस्थांमध्ये असल्याने आजही ही प्रथा तेवढ्याच भावनेने सुरू आहे.

प्रथमेश गुरववेंगुर्ला : कृष्ण विसर्जनावेळी मार्गात झोपून कृष्णाची स्वारी आपल्यावर ओलांडून घेण्याची प्रथा उभादांडा गावातील नवाबाग येथे सुरू आहे. या प्रथेला आज २०० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी ही प्रथा अजूनही त्याच श्रद्धेने पाळली जाते.नवाबाग येथे तांडेल कुटुंबीयाकडे श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. पूजन झाल्यानंतर उपवास सोडला जातो. यावेळी उपवासाला मुगाचे लाडू वाटले जातात. आरती झाल्यावर सर्वांना फराळ दिला जातो.पहाटेपर्यंत ग्रामस्थांची भजने सुरू असतात. पहाटे काकड आरती होते. त्यानंतर श्रीकृष्णाची पूजा झाल्यावर दुपारी महाप्रसाद होतो. सायंकाळी महिलांची फुगडी कार्यक्रम आणि त्यानंतर कृष्णाष्टमीचे आकर्षण असलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला सुरुवात होते.दहीहंडी फोडण्याअगोदर कबड्डी, वाघ-शेळी, रस्सीखेच, उंच उडी आदी पारंपरिक खेळही खेळले जातात. दहीहंडी फोडल्यावर कृष्ण विसर्जनाची लगबग सुरू होते.या विसर्जनाच्या मार्गात अबालवृद्ध आडवे झोपून घेतात. यानंतर विसर्जनाला निघालेला कृष्ण या अबालवृद्धांना ओलांडून समुद्रकिनारी जातो. कृष्ण आपल्याला ओलांडून गेला की तो आपले रक्षण करतो, अशी श्रद्धा इथल्या ग्रामस्थांमध्ये असल्याने आजही ही प्रथा तेवढ्याच भावनेने सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग