शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जाहीर, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ग्रामस्थांनी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 09:51 IST

या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात.

ठळक मुद्देखासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात. आंगणेवाडी गावकर मंडळ गावपारध करून (डुकराची शिकार) त्यानंतर पारंपारिक पद्धतीने तारीख ठरवितात. 

 सिंधुदुर्ग -  नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आंगणेवाडी (मसुरे, मालवण) येथील श्री भराडी देवीच्या २०१८ वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर झाली आहे.  श्री देवी भराडीची यात्रा  शनिवार  २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.  यावर्षी २६ जानेवारीची सुट्टी आणि २७ ला शनिवार, २८ ला रविवार असल्याने यात्रोत्सवाला तुफान गर्दी होणार आहे.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथे प्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. शुक्रवारी (१ डिसेंबर)  सकाळी देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख  निश्चित झाली आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा  शनिवार  २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेत कधीही बदल होत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आगणे कुटुंबिय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने नरेश आगणे यांनी जाहीर केले आहे. 

या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात.  देविला कौलप्रसाद लावून यात्रोत्सव ठरविला जातो. मुंबईकरांची प्रचंड गर्दी असते. महापालिका नगरसेवक, महापौर, सर्व पक्षांची नेतेमंडळी, सिनेस्टार दर्शन घेतात. यात्रोत्सव दीड दिवस चालतो. मंत्रिमहोदयही उपस्थित असतात. आंगणेवाडी गावकर मंडळ गावपारध करून (डुकराची शिकार) त्यानंतर पारंपारिक पद्धतीने तारीख ठरवितात. 

दरवर्षी किमान १० लाख भाविक दोन दिवसात दर्शनासाठी येतात. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि स्थानिक मिळून १५०० कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतात. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांच्या यात्रापूर्व नियोजनाच्या किमान ५ ते ६ बैठका होतात.