शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

बुद्धीबळ स्पर्धेत अनिकेत वेंगुर्लेकरचे यश

By admin | Updated: August 21, 2014 00:25 IST

खर्डेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी : साताऱ्यातील विभागीय स्पर्धेसाठी निवड

वेंगुर्ले : ओरोस जिल्हा क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय महाविद्यालयीन जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत वेंगुर्लेतील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत प्रदीप वेंगुर्लेकर या आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूने पाच फेऱ्यांतील पाच पैकी पाच गुण मिळवित विजेतेपद प्राप्त केले. त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अनिकेत वेंगुर्लेकर याने पांढऱ्या मोहरा घेऊन खेळताना ई-४ तर काळ्या मोहरा घेऊन खेळताना सिसिलियन डिफेन्सचा प्रभावी वापर करून हे यश संपादन केले. या जिल्हास्तरीय शालेय-महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक कणकवली कॉलेजच्या शैलेश तेंडोलकर (साडे चार गुण), तृतीय क्रमांक देवगड कॉलेजचा सचिन चव्हाण (चार गुण), चौथा क्रमांक कणकवली कॉलेजचा भूषण घाडी, तर पाचवा क्रमांक फोंडाघाट कॉलेजच्या नुपूर सावंत यांनी प्रगत गुणांच्या जोरावर पटकाविले. या पाचही खेळाडूंची निवड सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्तरांसाठी झाली आहे. या स्पर्धेत २९ स्पर्धक सहभागी झाले असतानाही बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या अनिकेत प्रदीप वेंगुर्लेकर याला बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ प्रशिक्षक काशिनाथ मंगल (कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभल्याने त्याने विजेतेपद लाभल्याचे स्पष्ट केले. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल लायन्स क्लबचे सिंधुुदुर्गातील उपप्रांतपाल अजित फाटक, अ‍ॅड. अजित भणगे, डॉ. प्रल्हाद मणचेकर, सर्व लायन्स तसेच रोटरी क्लबचे सचिव राजन गिरप, माजी अध्यक्ष संजय पुनाळेकर, बॅ. खर्डेकर, कॉलेजचे प्राचार्य सिध्दार्थ फडतरे, सर्व प्राध्यापक, विरेंद्र देसाई, सुरेंद्र चव्हाण यांनी अनिकेत वेंगुर्लेकर व इतर विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)