शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सिंधुदुर्गनगरीत मोर्चा, मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:27 IST

सरकारने कल्याणकारी योजना बंद करण्याचा सपाटा लावला असून महाराष्ट्राचे बालपण पायदळी तुडविण्याचा आणि कुपोषण वाढविण्याचा शासनाचा घाट असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परूळेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सिंधुदुर्गनगरीत मोर्चामागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

ओरोस : कमी पटसंख्येच्या शाळांपाठोपाठ कमी पटसंख्येच्या अंगणवाड्या बंद करण्याबाबत शासनाने १६ जुलै रोजी काढलेला शासन निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह लहान मुलांवर अन्याय करणारा आहे. सरकारने कल्याणकारी योजना बंद करण्याचा सपाटा लावला असून महाराष्ट्राचे बालपण पायदळी तुडविण्याचा आणि कुपोषण वाढविण्याचा शासनाचा घाट असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परूळेकर यांनी केला आहे.

अंगणवाड्या बंद पाडण्याचा शासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी  ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हा परिषद कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या न्याय मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद स्तरावरील मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

ज्या अंगणवाडीत २५ मुले नाहीत, अशा अंगणवाड्या बंद करून त्या मुलांना इतर अंगणवाडीत सामावून घ्या व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रिक्त जागी नेमणूक द्या, असा शासनाने १६ जुलै रोजी शासन निर्णय काढला आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील सुमारे ५० हजार अंगणवाड्या बंद पडणार आहेत.

राज्यातील बहुतेक भाग हा आदिवासी व डोंगराळ आहे. त्यामुळे अंगणवाड्या बंद पडल्यास लहान मुलांना मैल दोन मैल चालत दुसऱ्या अंगणवाडीमध्ये जावे लागणार आहे. असे करण्यापेक्षा पालक आपल्या लहान मुलांना घरी ठेवणे पसंत करतील, असे परूळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.सरकारने कल्याणकारी योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोपही यावेळी परूळेकर यांनी केला. अंगणवाड्या बंद पाडण्याचा शासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार डाव हाणून पाडण्यासाठी सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कमल परूळेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले .आंदोलनाचे टप्पे

  1. २७ आॅगस्ट - सर्व प्रकल्प कार्यालयांवर मोर्चा
  2. २८ आॅगस्ट - आयुक्त कार्यालयावर मोर्चा
  3. २५ सप्टेंबर -मंत्रालयावर मोर्चा

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामsindhudurgसिंधुदुर्ग