शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संप काळातील अंगणवाडी सेविकांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्याप्रकरणी कुडाळात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 21:34 IST

संप काळातील अंगणवाडी सेविकांवर चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा देऊन दहशत राबवून सरकारबद्दल असंतोष पसरविण्याचा ठेका घेतल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा महिला बालकल्याण विभागावर अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्या सचिव कमल परूळेकर यांनी केला.

कुडाळ (सिंधुदुर्ग) : संप काळातील अंगणवाडी सेविकांवर चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा देऊन दहशत राबवून सरकारबद्दल असंतोष पसरविण्याचा ठेका घेतल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा महिला बालकल्याण विभागावर अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्या सचिव कमल परूळेकर यांनी केला. नोकरी वरून काढून टाकण्या संदर्भात दिलेल्या नोटीसांच्या विरोधात संघटनेच्या वतीने कुडाळ पंचायत समितीवर काढलेल्या मोर्चा प्रसंगी बोलताना केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या मोर्चात तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.  सोमवारी दुपारी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घोषणा देऊन पंचायत समितीचा परिसर दणाणुन सोडला. या मोर्च्यावेळी कमलताई परूळेकर व काही अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीचे सभापती राजन जाधव व गटविस्तार अधिकारी विजय चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी परूळेकर यांनी सांगितले की, आपल्या न्याय मागण्या व हक्क मिळविण्यासाठी संपुर्ण राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी संप फुकारला होता. आता हा संप मिटला असून अंगणवाडी सेविका व मदतनीस या कामावर देखिल रूजु झाल्या आहेत. असे असताना केवळ याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाने संपकर्त्यांच्या कामावरून कमी करण्याच्या अंतिम नोटीसा बजावुन दहशत पसरविण्याचे काम करीत आहेत.तसेच परूळेकर यांनी सांगितले की, दोन नोटीसा बजावल्यानंतर आता कुडाळ महिला बालकल्याण विभागाने १० वर्षांपुर्वीच्या शासन निर्णयाचा वापर करून चुकीच्या पध्दतीने कमावरून कमी करण्याची अंतिम नोटीसा या तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना अशा नोटीस कशा काय बजावता येतील असे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.आता आम्ही निवेदन नाही तर नोटीसांच्या विरोधात खुलासा आणला असुन जो पर्यंत सर्व खुलाशांवर पोहोच मिळत नाही तो पर्यंत आम्ही येथुन हलणार नाही असा ही इशारा परूळेकर यांनी दिला. त्यांनी सांगितले की, संप काळात मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या पत्रावर जावक क्रमांक नसलेली नोटीस राज्यातील इतर जिल्ह्यात प्रसिध्द केली जाते. आयओएस मानांकित जिल्हा परिषदेमध्ये असे कारभार चालतात का? असा ही प्रश्न त्यांनी उपस्थित करीत प्रशासनाच्या या कारभाराच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.यावेळी गटविस्तार अधिकारी विजय चव्हाण यांनी महीला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकांच्या लेखी खुलाशावर पोहोच देवुन त्यांचे म्हणणे वरीष्ठापर्यंत पोहचवा अशी सूचना केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच बजावल्या नोटीसा.- कमलताई परूळेकरसंपूर्ण राज्यभर संप सुरू होता. मात्र राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात अशा प्रकारे संपकर्त्या अंगणवाडी सेविकांना नोटीसा कोणीही बजावल्या नाहीत. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच प्रशासनाने अशा प्रकारे कशा काय नोटीसा बजावल्या? संप करणे म्हणजे गुन्हा आहे का? असे प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.पगार मिळत नाही त्यासाठी काय करता? - कमलताई परूळेकरमहिला बाल कल्याण विभागाला फक्त नोटीसा काढायचे कळते मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पगार, पोषण आहाराची बिले सहा सहा महीने मिळत नाहीत. त्यासाठी या विभागाच्यावतीने काय केले जाते असा ही सवाल परूळेकर यांनी उपस्थित केला. वरीष्ठांच्या निर्णयानुसार बजावल्या नोटीसा- अधिकारीयावेळी अधिकाऱ्यांनी अगोदर पाठविलेल्या पत्रांचे उत्तर न दिल्यामुळे अंतिम नोटीसा देण्यात आली. अतिरिक्त मुख्यकार्यकारी यांच्या सभेतील निर्णयानुसार हा निर्णय घेतला आहे असा खुलासा केला.