शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

आंगणेवाडी जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात, महाराष्ट्रात प्रसिद्ध श्री भराडी देवीची जत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 11:37 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी

मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी केली आहे. पहाटे ३.१५ वाजता देवीचे दर्शन सुरू झाले आहे.आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही जत्रा केवळ आंगणे कुटुंबीयांपूर्ती मर्यादित स्वरुपात ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर आंगणेवाडीची जत्रा भाविकांच्या गर्दीत संपन्न होत आहे.जत्रेसाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी उपस्थिती दर्शविण्यात प्रारंभ केला. त्यानंतर सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास देवीच्या दर्शनाचा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. पहाटेच्या सत्रात मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती दर्शवली आहे. यात्रेकरूंची कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी काळजी घेत आहेत.कोरोनाचे नियम पाळून यात्रा उत्साहात सुरू झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, विनोद तावडे, आशिष शेलार, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह दिग्गज नेते मंडळीही जत्रोत्सवास भेट देणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग