शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

..अन् सिंधुदुर्गातील गाव सोडून गेलेले चिंदरमधील ग्रामस्थ पुन्हा परतले, सुनसुन गाव पुन्हा गजबजले

By सुधीर राणे | Updated: November 22, 2022 18:25 IST

वेशीबाहेर असलेल्या ग्रामस्थांना गाव भरण्याची होती प्रतिक्षा

आचरा: श्री देव रवळनाथाचा कौल मिळताच चिंदर गाव आज, मंगळवारी पुन्हा गजबजला. निसर्गाच्या सानिध्यात थाटलेले आपले संसार पुन्हा एकत्र करीत गावाकऱ्यांची पावले आपल्या घराच्या दिशेने वळली. शेकडो वर्षापासून परंपरा जपणाऱ्या गावपळण पुर्ण झाल्याचा कौल मिळताच चार दिवसांनी गावकरी गुराढोरासह पुन्हा गावात परतले.ग्रामस्थांनी सहजीवनाचा आनंद लुटून परत गाव गाठला आहे. तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीकरिता कौल मिळाल्याने १८ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गावपळण पार पडली. सोमवारी दुपारी देवाचा कौल न झाल्याने मंगळवारी दुपारी देवाचा कौल झाल्यावर गाव भरण्यास सुरुवात झाली होती. चाकरमानी, नातेवाईक, शेजारील गावातील ग्रामस्थ हे गावपळणीत उत्साहाने सहभागी झाले होते.चिंदर गावाच्या सीमेलगतच्या आचरा, वायंगणी, कालावल, त्रिबंक येथे चिंदरवासीय झोपाड्या उभारून आपले संसार थाटून राहिले होते. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनोखा अनुभव गावकऱ्यांनी घेतला. चार रात्रीच्या मुक्कामानंतर देव रवळनाथचा कौल झाल्याने चिंदरवासीय आज मिळेल त्या वाहनाने आपल्या घराकडे धाव घेतली. तर काहीजणांनी आपला रानात थाटलेला संसार गोळा करून पायी चालत घर गाठले.चार दिवस सुनसुन झालेले गाव पुन्हा गजबजलेशुक्रवारपासून गावपळणीमुळे वेशीबाहेर असलेल्या चिंदर ग्रामस्थांना सोमवारी गाव भरण्याची प्रतिक्षा होती. मात्र देवाने कौल दिला नसल्याने वेशीबाहेर एक दिवसाने मुक्काम वाढला होता. आज, मंगळवारी गाव भरण्याचा कौल मिळताच ग्रामस्थ गावात आले व गावाचे जीवनमान पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. चिंदर गाव गेले चार दिवस शांत असणारा गाव पुन्हा गजबजला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग