शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अखेर त्या महिलेला आपले कुटुंब मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:10 IST

Women Sindhudurg Police- सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग संस्थेमुळे गोवा राज्यातील बिचोली येथील कुटुंबापासून ताटातूट झालेल्या महिलेची तिच्या कुटुंबाशी भेट झाली आहे. स्पष्ट काही सांगता न येणाऱ्या महिलेला कुडाळ पोलिसांच्या मदतीने कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे...अन् अखेर त्या महिलेला आपले कुटुंब मिळाले सखी वन स्टॉप सेंटरची मदत : बेपत्ता महिलेची कुटुंबीयांशी भेट

सिंधुदुर्ग : जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग संस्थेमुळे गोवा राज्यातील बिचोली येथील कुटुंबापासून ताटातूट झालेल्या महिलेची तिच्या कुटुंबाशी भेट झाली आहे. स्पष्ट काही सांगता न येणाऱ्या महिलेला कुडाळ पोलिसांच्या मदतीने कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.कुडाळ तालुक्यातील पावशी येथे २६ जानेवारी २०२१ रोजी रात्री १०.३० वाजता, पोलिसांना एक फिरती महिला आढळली होती. तिची चौकशी केल्यावर समजले की त्या महिलेला स्वतःची माहितीही व्यवस्थित सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सखी वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधला. जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत हे सखी वन स्टॉप सेंटर चालविण्यात येते.पावशी येथे सापडलेल्या या महिलेचे सखी वन स्टॉप सेंटर येथे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी ती महिला असंबंद्ध बोलू लागली होती. यावेळी सखी वन स्टॉप सेंटर येथे समुपदेशन करताना काही माहिती मिळाली. तसेच तिला उपचारांची आवश्यकता असल्याने तिला कुडाळ पोलिसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.तिने दिलेल्या त्रोटक माहितीच्या आधारे ती गोवा राज्यातील बिचोली येथील असल्याचा शोध घेतला. बिचोली, गोवा येथील पोलीस ठाण्यामध्ये या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली होती. या सर्व बाबींची खातरजमा करून व महिलेची ओळख पटवून ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ पोलिसांच्या मदतीने सखी वन स्टॉप सेंटरने या महिलेला नातेवाईकांच्या ताब्यात दिले आणि ताटातूट झालेल्या या नात्यांची पुन्हा भेट घडली.याप्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, विधी सल्लागार तथा प्रभारी संरक्षण अधिकारी नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात आली. तसेच गृह विभागाच्या पोलीस अधीक्षक संध्या गावडे आणि त्यांचे सहकारी यांचे सहाय्य लाभले. 

टॅग्स :Womenमहिलाsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस