शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आजगाव येथे वडिलोपार्जित जमीन, राऊतांकडून माझी नाहक बदनामी; दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

By अनंत खं.जाधव | Updated: July 16, 2024 14:59 IST

सावंतवाडी : आजगाव येथे असलेली आमची जमीन ही वडिलोपार्जित आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या प्रकल्पात आमची एक इंच सुध्दा ...

सावंतवाडी : आजगाव येथे असलेली आमची जमीन ही वडिलोपार्जित आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या प्रकल्पात आमची एक इंच सुध्दा जमीन जात नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी माझी नाहक बदनामी करू नये. मी त्या ठिकाणी प्रकल्प आणला माझी जमीन दिली हे सिध्द करावे, अन्यथा आत्मक्लेश करून घ्यावा, असे प्रतिआव्हान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते मंगळवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी स्थानिकांना प्रकल्प नको असेल तर तो केला जाणार नाही. मी ग्रामस्थांसोबत आहे, अशी भूमिकाही घेतली.उद्धवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी दोन दिवसापूर्वीच केसरकर कुटुंबियांची आजगाव येथील मायनिंग क्षेत्रात जमिन असल्याचा आरोप केला होता. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आजगाव येथे होणार्‍या मायनिंग प्रकल्पाबाबत आपल्याला माहित नाही. तेथील स्थानिक लोकांना प्रकल्प नको असतील तर तेथे प्रकल्प होणार नाही. लवकरच याबाबत मी त्यांची भेट घेणार आहे. मात्र त्या ठिकाणी असलेली आमची जागा ही वडिलोपार्जित आहे. विषेश म्हणजे त्या ठिकाणी असलेली एक एकर जमीन सुध्दा मायनिंग मध्ये जात नाही अशा परिस्थिती मीच प्रकल्प आणला, असा राऊत यांनी केलेला आरोप चुकीचा आहे.एक तर त्यांनी तो आरोप सिध्द करावा, अन्यथा आपण माझी बदनामी केली म्हणून आत्मक्लेश करावा, असे प्रतिआव्हान त्यांनी राऊतांना यांना दिले. राऊत यांच्यासह उध्दव सेनेची आरोप करण्याची सवयच असल्याचे ते यावेळी म्हणाले.बबन साळगावकर यांनी एसटी प्रशासनाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाबाबत केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, माझ्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर ते आंदोलन करायची भाषा करीत असतील तर त्यांनी खुशाल आंदोलन करावे. मात्र बसस्थानक परिसरात सिमेंटीकरण करण्यात येणार आहे. यापुर्वी सुध्दा मी स्वखर्चातून सिमेंटीकरण केले होते. त्यामुळे त्यांच्या टीकेवर मी काय बोलणार? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच सावंतवाडी मतदारसंघातील बरेच प्रश्न सुटल्याचे केसरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Vinayak Rautविनायक राऊत