शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

देवगडच्या विकासातील केंद्रबिंदू आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:36 IST

देवगडच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून भाजपा नेते संदेश पारकर यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली. यावेळी डी. व्ही. पी. कंपनीच्या प्रतिनिधींकडून या प्रकल्पाचा आराखडा व अन्य बाबींची माहिती त्यांनी घेतली.

ठळक मुद्देदेवगडच्या विकासातील केंद्रबिंदू आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरूसंदेश पारकरांची प्रकल्पस्थळी भेट, कंपनीच्या प्रतिनिधींकडून घेतली कामाची माहिती

देवगड : देवगडच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून भाजपा नेते संदेश पारकर यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली. यावेळी डी. व्ही. पी. कंपनीच्या प्रतिनिधींकडून या प्रकल्पाचा आराखडा व अन्य बाबींची माहिती त्यांनी घेतली.तत्पूर्वी त्यांनी आनंदवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन या प्रकल्पाच्या कामात स्थानिक ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे असून स्थानिकांना विश्वासात घेत हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नगरसेवक प्राजक्ता घाडी, राजेंद्र वालकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, संजय बांदेकर, हनुमंत कुबल, किशोर कुबल, सुदेश धुरी, गुरुनाथ कुबल, गुरुनाथ तारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या चर्चेत प्रामुख्याने आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरू झाले असून या प्रकल्पाच्या कामात स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमार, व्यापारी या सर्वांचे सहकार्य असून येथील प्रकल्पाचे काम स्थानिक व्यवसायास बाधा न येता पूर्णत्वास नेणार असल्याचे पारकर यांनी सांगितले. प्रकल्पासंदर्भात जनतेशी सुसंवाद साधणे व जनतेपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असून या प्रकल्पावर सुमारे ८२ कोटींहून अधिक खर्च होत असताना यात ८५० मीटर लांबीच्या भागाचा तसेच २८० पीलरचा समावेश आहे.सद्यस्थितीत या प्रकल्पाच्या लायनिंगचे काम सुरू झाले असून बंदर प्रकल्पामुळे मच्छिमारांना विविध सोयीसुविधा निर्माण होणार असल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचे काम भाजपा-शिवसेना युतीच्या नेत्यांच्या माध्यमातून मार्गी लागले असून यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, खासदार विनायक राऊत यांचे विशेष प्रयत्न आहेत तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार या प्रकल्पाकरिता प्राधान्याने निधीची तरतूद करणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग