शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कासार्डेतील वैजयंती मिराशी यांनी उभारली आनंदाची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 16:30 IST

Gudhipadwa Kankvali Sindhudurg : कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडी येथील साठवर्षीय वैजयंती शांताराम मिराशी या वृद्धेच्या घरात अठराविश्व दारिद्र्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घर पडले आहे. दररोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना, तिने मंगळवारी आपल्या घरासमोर आनंदाची गुढी उभारली असली, तरीही तिला मदतीची आवश्यकता आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही.

ठळक मुद्देकासार्डेतील वैजयंती मिराशी यांनी उभारली आनंदाची गुढी गेली ५ वर्षे राहतात पडक्या घरात : शासनाची मदत मिळण्यासाठी आर्त विनवणी

निकेत पावसकरतळेरे : कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडी येथील साठवर्षीय वैजयंती शांताराम मिराशी या वृद्धेच्या घरात अठराविश्व दारिद्र्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घर पडले आहे. दररोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना, तिने मंगळवारी आपल्या घरासमोर आनंदाची गुढी उभारली असली, तरीही तिला मदतीची आवश्यकता आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही.कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती मिराशी ही साठवर्षीय वृद्ध महिला एकटीच घरात राहते. गेल्या अनेक वर्षांपासून घर बांधणीसाठी शासकीय मदत मिळावी यासाठी ती प्रयत्नशील आहे. मात्र, कोणीही दाद देत नाहीत. स्वत: काम करेल, त्याचवेळी दोनवेळचे जेवण मिळते, अशी परिस्थिती असताना, शासकीय मदतीची अजूनही प्रतीक्षाच आहे.मातीचे आणि कौलारू असलेले घर पाच वर्षांपूर्वीच पडले. त्याच घरात ती कशीबशी राहते. गेले वर्षभर घरात वीज नसल्याने घरासमोरील वीज खांबावरील विजेच्या प्रकाशात जेवण करते आणि घरासमोर एकटीच झोपते. आजूबाजूला जंगलसदृश परिस्थिती असताना ती वृद्धा धाडसाने राहत आहे. मागच्या पावसाळ्यात वीज मीटर जळाल्याने तो काढून ठेवला आहे. नवीन मीटर घ्यायचा, तर पैसे भरायची तेवढी आर्थिक ताकद नाही. त्यामुळे दरमहा येणारे वीजबिल भरते. याही वयात काम करून मी दिवस काढत असल्याचे ती सांगते. या पावसाळ्यापूर्वी घर बांधण्यासाठी मदत मिळावी, अशी तिची इच्छा आहे. तिला समाजातील दानशूरांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे.शासन मदत देईल का?घराच्या आजूबाजूला फारसी घरेही नाहीत. मग या पडक्या घरात पावसाळ्यात राहता कसे? यावर माहिती देताना ती म्हणाली की, पावसाळ्यात कशीतरी कागद टाकून राहते. कसेतरी दिवस काढते. जवळजवळ गेली १० वर्षे घर बांधणीसाठी मदत मिळावी म्हणून मी अक्षरश: वाट पाहत आहे. मात्र कोणीही दाद देत नाही. माझ्या अखेरच्या दिवसात तरी घर बांधायला शासन मदत देईल का? असा प्रश्न तिने उपस्थित केला. 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग