शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: पाणी काढण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू

By अनंत खं.जाधव | Updated: September 26, 2023 12:21 IST

सावंतवाडी : पहाटे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नागेश महादेव राऊळ (वय-६३) असे मृताचे नाव आहे. ...

सावंतवाडी : पहाटे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नागेश महादेव राऊळ (वय-६३) असे मृताचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना आज, मंगळवारी मळगाव कुंभारआळी येथे घडली. याबाबतची माहिती नातेवाईक प्रमोद गावडे (रा. कोनापाल) यांनी सावंतवाडी पोलिसांत ठाण्यात दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. नागेश राऊळ हे रोज पहाटे घरालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीत पाणी आणण्यासाठी जात असत. नेहमीप्रमाणे ते पहाटे विहिरीकडे गेले. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. यावेळी विहिरीच्या बाजूला कळशी व दोरी दिसून आल्याने स्थानिकांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला.याबाबतची खबर त्यांचे नातेवाईक तथा सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना दिली. त्यानंतर प्रमोद गावडे यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. मृत नागेश राऊळ, यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मूली, सून, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यू