शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्मचारी ठार

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 20, 2022 15:54 IST

आजर्‍याहून आंबोलीला डयूटीसाठी येत असताना ही दुर्घटना घडली

सिंधुदुर्ग : दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात आंबोली सिंधुदुर्ग बँकेचे कर्मचारी निशिकांत पांडुरंग बागडी (४२) हे जागीच ठार झाले आहे. तर चौकुळ शाखेचे व्यवस्थापक संतोष बजरंग शिंदे (३५) रा.आजरा याचे दोन्ही पाय जायबंदी झाले आहेत. हा अपघात आज, बुधवारी सकाळच्या सुमारास नांगरतास-दहीचाव्हाळ येथे घडला.दरम्यान जखमीसह मृताला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आणण्यात आले आहे. दोघेही आजर्‍याहून आंबोलीला डयूटीसाठी येत असताना ही दुर्घटना घडली. जखमी शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.याबाबत अधिक माहीती अशी की, यातील मृत बागडी आणि शिंदे हे आजरा येथे राहतात. ते नेहमी प्रमाणे आज कामासाठी दुचाकीने आंबोलीच्या दिशेने येत होते. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की बागडी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिदे यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली.अशा अवस्थेत त्या ठिकाणी जमलेल्या काही ग्रामस्थ व प्रवाशांनी त्या दोघांना अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. परंतु बागडी यांचा पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाला. असे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. जखमी शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडीकडे पाठविण्यात आले आहे.या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा सुरू केला.  दरम्यान याबाबतची माहिती मिळताच आंबोली शाखेचे व्यवस्थापक शाम पोकळे यांनी धाव घेवून त्यांना मदतकार्य केले. यावेळी पोलीस दीपक शिंदे, अभिजित कांबळे, संभाजी पाटील उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात