शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: पार्टीसाठी गेलेल्या प्रौढ व्यक्तीचा जानवली तलावाजवळील डोहाच्या पाण्यात बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:42 IST

त्यांच्यासोबत गेलेल्या चौघांजवळ चौकशी केली असता त्यांनी संदिग्ध माहिती दिली

कणकवली : कणकवली शहरापासून जवळच असलेल्या जानवली, बौद्धवाडी नंबर १ येथील रहिवासी किसन भिकाजी पवार (५२) यांचा जानवली, सखलवाडी पाझर तलावानजीक खोल पाण्याने भरलेल्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.किसन पवार यांच्यासह अन्य चौघेजण रविवारी पार्टीसाठी जानवली, सखलवाडी पाझर तलाव परिसरात गेले होते. यावेळी किसन पवार हे धरण क्षेत्रात असलेल्या खोल पाण्याने भरलेल्या डोहात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत किसन पवार घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. तसेच त्यांच्यासोबत गेलेल्या चौघांजवळ चौकशी केली असता त्यांनी संदिग्ध माहिती दिली. मात्र, पवार कुटुंबीयांनी याबाबत अधिकची माहिती घेत, तुम्ही सर्व कुठे गेला होता? कुठे पार्टी केली? असे प्रश्न त्या चौघांना विचारले. तसेच जानवली तलाव क्षेत्रातील मुख्य गेट पासून शोधाशोध सुरू केली. त्या चौघांना घेऊन ज्या ठिकाणी त्यांनी एकत्र जेवण केले तिथपर्यंत ते पोहोचले. यावेळी किसन यांचा मृतदेह तेथे डोहातील पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसाना या घटनेबाबत पवार यांचे नातेवाईक महेश महादेव कदम यांनी कळविले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, हवालदार गुणीजन, पोलिस पाटील मोहन सावंत, दामोदर सावंत, संदीप सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली ? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू