शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 'हर घर तिरंगा' उपक्रमासाठी ध्वज उपलब्ध करा, जिल्हाधिकाऱ्यांची व्यापारी महासंघाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 17:11 IST

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट कालावधीत स्वराज महोत्सव साजरा करण्यात येणार

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट कालावधीत स्वराज महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत 'हर घर तिरंगा' या उपक्रमासाठी व्यापारी महासंघाने तिरंगा ध्वज उपलब्ध करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. व्यापारी महासंघा बरोबर आज, सोमवारी बैठक घेण्यात आली या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा प्रशासन अधिकारी अवधुत तावडे, एनआरएलएमचे जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार यांच्यासह व्यापारी महासंघाचे कार्यवाहक नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, शार्दुल घुर्ये, अनिकेत नेवाळकर आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याला लागणाऱ्या तिरंगा झेंड्यांची उपलब्धता व्यापारी महासंघाने करावी. त्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या मार्फत तसेच व्यापारी महासंघानेही आपल्या मार्फत तिरंगा झेंडा विक्रीसाठी उपलब्ध ठेवावा. त्यासाठी जिल्हास्तरावर समन्वयक नेमण्यात आले आहेत. हा उपक्रम सर्वांनीच यशस्वी करावा, असेही त्या म्हणाल्या.ध्वज संहितेच्या निकषानुसार ध्वज बनवण्यात यावेत. त्याचा सन्मान राखला जाईल याचीही दक्षता सर्वांनी घ्यावी असेही निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग