शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
4
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
5
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
6
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
7
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
8
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
9
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
10
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!
11
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
12
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
13
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
14
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
15
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
16
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
17
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
18
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
19
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
20
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

Sindhudurg: रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच आगीच्या भक्ष्यस्थानी, ..अन् अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:30 IST

प्रसंगावधान राखल्याने मनुष्यहानी टळली

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबुळी येथे रुग्णाला घेऊन जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई - गोवा महामार्गावर घडली. गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यामुळे रुग्णांसह इतर सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर म्हापसा येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.याबाबत माहिती अशी, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका या इतरत्र असल्याने रुग्णाला घेऊन जाण्यासाठी दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वेंगुर्ला वजराठ येथील रुग्णाला लघुशंकेचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागविण्यात आली होती. या रुग्णाला बसवून रुग्णवाहिका रात्रीच्या सुमारास गोवा - बांबुळीच्या दिशेने रवाना झाली.

मात्र, रुग्णवाहिका गोवा राज्यातील म्हापसा येथील कोलवाळ फुलाजवळ गेली असता रुग्णवाहिकेमधून धुराचे लोट येऊ लागले. समोर बसलेल्या चालक व अजून एका व्यक्तीने हा सर्व प्रकार बघितल्यावर त्यांनी लागलीच आरडाओरड करत रुग्णवाहिका थांबवली. त्यानंतर रुग्णवाहिकेत बसलेल्या रुग्णाला व त्याच्या नातेवाइकाला उतरण्यास सांगितले. त्यानंतर सर्वजण रुग्णवाहिकेतून उतरले. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याने त्याला लागलीच उतरविण्यात आले.प्रसंगावधान राखल्याने मनुष्यहानी टळलीरुग्णवाहिकेचा भडका उडाला. त्यानंतर रुग्णवाहिकेने पेट घेतला आणि अल्पावधीतच रुग्णवाहिका जळून खाक झाली. ही घटना महामार्गावर घडल्याने अनेक वाहने थांबविण्यात आली होती. त्यानंतर म्हापसा अग्निशमन बंब मागवून आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेबाबत आरोग्य विभागाला पुसटशीसुध्दा कल्पना नव्हती. मात्र, सर्वच यंत्रणा अलर्ट झाली आणि त्यांनी नंतर माहिती घेण्यास सुरुवात केली. पण, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मनुष्यहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी