शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली घाटरस्ता खचला; मोबाईलसाठीच्या केबलमुळे घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 15:43 IST

घाट रस्त्यावर छोटी-मोठी मोठी दरड येण्याचे प्रकार चालू असतानाच आंबोलीतील मुख्य धबधब्यापाशी तसेच त्याच्या पुढे व मागे मोठ्या प्रमाणावर रस्ता खचण्याचे प्रकार घडले आहेत.

आंबोली : आंबोलीमध्ये गेल्या आठ दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट रस्त्यावर छोटी-मोठी मोठी दरड येण्याचे प्रकार चालू असतानाच आंबोलीतील मुख्य धबधब्यापाशी तसेच त्याच्या पुढे व मागे मोठ्या प्रमाणावर रस्ता खचण्याचे प्रकार घडले आहेत. ज्या ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तो या ठिकाणी घालण्यात आलेल्या मोबाईल केबलमुळे खचला असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे.आंबोली ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आंबोली मुख्य धबधब्यापाशी मोठ्या प्रमाणावर रस्ता खचला आहे. आणखी एक-दोन दिवसात हा रस्ता पूर्ण खचून वाहतूक पूर्ण बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. आंबोली मुख्य धबधबा तसेच आणखी पुढे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्या ठिकाणी दूरध्वनी कंपन्यांनी मारलेल्या केबलच्या खड्ड्यांमुळे संरक्षक कठडे व रस्ते खचल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी आंबोली घाटामध्ये दरड कोसळली होती. त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा दरड खाली येत असून वारंवार अंबोली घाट रस्ता बंद होत आहे. सद्यस्थितीत आंबोली घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला असून, केवळ टू व्हीलर जातील एवढाच रस्ता चालू आहे.तर एकीकडे चौकुळ व आंबोलीला जोडणाऱ्या पापडी या पुलावर सलग चार दिवस पाणी असल्याने चौकूळ गावाचा संपर्कही तुटला आहे. सद्यस्थितीत आंबोलीमध्ये दूध, पालेभाजी सिलिंडर यांचा तुटवडा जाणवत असून, आंबोली घाटरस्ता बंद झाल्यास येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. सद्यस्थितीत आंबोली घाट रस्त्याची पाहणी करण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी फिरकले नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.तर ग्रामस्थांच्या मते सद्यस्थितीत ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे. त्याठिकाणी हुशार व लवकरात लवकर काम करणारे इंजिनीअर व आर्किटेक यांना बोलावून आणून योग्य ती उपाययोजना त्वरित करण्याची मागणी होत आहे. पाच वर्षांपूर्वी घाट कोसळला होता, त्यावेळी कुचकामी ठेकेदार व इंजिनीयर यांनी मिळून स्वतःच्या स्वार्थासाठी ज्याप्रमाणे वेळकाढूपणा केला होता, त्याप्रमाणे जर आताही वेळ काढूपणा केल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा आंबोली ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशन