शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंबोलीत बॅटरी आॅपरेट कार, पर्यटन सफारीसाठी निर्णय : पहिल्या टप्प्यात दहा कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 15:23 IST

आंबोलीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीच्या पर्यटन सफारीसाठी बॅटरी आॅपरेट कार घेण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या माध्यमातून दहा कार घेण्यात येण्यात येणार आहेत. या सर्व कार वनविभाग स्थानिक वनसमितीकडे देणार असून, त्यांच्या माध्यमातून त्या चालविण्याचा त्यांचा विचार आहे.

ठळक मुद्देआंबोलीत बॅटरी आॅपरेट कार, पर्यटन सफारीसाठी निर्णय पहिल्या टप्प्यात दहा कार; पालकमंत्र्यांची संकल्पना

अनंत जाधव सावंतवाडी : आंबोलीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीच्या पर्यटन सफारीसाठी बॅटरी आॅपरेट कार घेण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या माध्यमातून दहा कार घेण्यात येण्यात येणार आहेत. या सर्व कार वनविभाग स्थानिक वनसमितीकडे देणार असून, त्यांच्या माध्यमातून त्या चालविण्याचा त्यांचा विचार आहे.आंबोलीत मोठ्या प्रमाणात देशभरातून पर्यटक येत असतात. मात्र, या पर्यटकांना आंबोलीच्या पर्यटनाची ओळख हवी तशी होत नाही. तसेच आंबोलीत पर्यटन गाईडही नाही. आंबोलीच्या जंगलात बरेच काही पाहण्यासारखे आहे. मात्र, आंबोलीची ओळख असलेला धबधबाच फक्त पर्यटक पाहतात आणि निघून जातात. म्हणूनच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीच्या पर्यटन सफारीला चालना मिळावी यासाठी खास पुढाकार घेतला आहे.पावसाळ््यात धबधबे पाहण्यासाठी लाखो पर्यटक हे शनिवारी व रविवारी येत असल्याने आंबोलीच्या घाटात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येणाऱ्या पर्यटकांनी आंबोलीतच आपले वाहन पार्किंग करावे आणि खाली बॅटरी आॅपरेट कारने यावे, अशी संकल्पना असल्याने मंत्री केसरकर यांनी या बॅटरी आॅपरेट कार आणण्याचे ठरविले आहे. या कार वनविभागाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहेत. या सर्व कार वनसमिती खरेदी करणार आहे.वनविभागाने दीपक केसरकर यांच्याकडे ३० कारचा प्रस्ताव दिला होता. मात्र आता पहिल्या टप्प्यात मंत्री केसरकर यांनी दहाच कार खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. या खरेदीला नियोजनच्या बैठकीतही मान्यता मिळाली असून, आता पुढील प्रकिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली आहे.बॅटरी आॅपरेट कारऐवजी सहाआसनी घ्या : वनविभागाचे मतवनविभागाने आंबोलीत बॅटरी आॅपरेट कार घेण्याऐवजी सहा आसनी रिक्षा खरेदी करण्यात याव्यात, अशी मागणी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे केली आहे. मात्र केसरकर यांनी बॅटरी कार खरेदीवरच भर दिला आहे.स्थानिक सहा आसनीधारक अडचणीतजर वनविभागाने बॅटरी आॅपरेट कार किंवा सहा आसनी रिक्षा जर आंबोलीत चालविल्या तर स्थानिक सहा आसनी रिक्षा चालकांवर अन्याय होणार आहे. कारण त्याच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीवर आपोआप निर्बंध येणार आहे. त्यामुळे यावर सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे.बॅटरी आॅपरेट कारच घेणार : दीपक केसरकरआम्ही आंबोलीच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बॅटरी आॅपरेट कार खरेदी करणार असून, पहिल्या टप्प्यात दहा कार खरेदी केल्या जाणार आहेत. सहा आसनी रिक्षा खरेदी केल्या जाणार नाहीत. पर्यावरणदृष्ट्या हा प्रकल्प असून, वनविभाग किंवा पर्यटन यांच्या माध्यमातून या कार खरेदी केल्या जाणार आहेत.

टॅग्स :carकारsindhudurgसिंधुदुर्ग