शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

दिव्यांगांच्या मदतीसाठी सदैव कटिबद्ध

By admin | Updated: October 1, 2016 00:22 IST

प्रसन्ना कुबल : वेंगुर्लेत दिव्यांग मेळावा उत्साहात, जिद्दीने उभे राहण्याचे आवाहन

वेंगुर्ले : दिव्यांग बांधवांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता जिद्दीने समाजात उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत, वेंगुर्ले नगरपरिषद त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी दिव्यांग मेळाव्यात दिली.ज्या दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा शहरातील दिव्यांगांना नगरपरिषदेमार्फत शल्यचिकित्सक ओरोस येथे तपासणी करून प्रमाणपत्र मिळवून देण्यात येईल, असेही कुबल यांनी सांगितले. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या व्यायामशाळेत दिव्यांगांसाठी आर्थिक अनुदान वाटप व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.नगरपालिका उत्पन्नाच्या ३ टक्के रक्कम दिव्यांगांसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. तसेच या व्यतिरिक्त जी मदत दिव्यांगांना आवश्यक आहे, ती देण्यास नगरपरिषद सदैव तयार आहे, असेही नगराध्यक्ष कुबल म्हणाले. नगरसेवक सुषमा प्रभूखानोलकर, मुख्याधिकारी कोकरे व दिव्यांग कांचन घाडी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा नार्वेकर, नगरसेवक सुषमा प्रभूखानोलकर, नीला भागवत, नम्रता कुबल, रमण वायंगणकर, वामन कांबळे, महेश वेंगुर्लेकर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, सहायक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, समुदाय संघटक अतुल अडसुळ, सागर चौधरी यांसह नगरपरिषद कर्मचारी व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. शशांक मराठे यांनी केले. (प्रतिनिधी)दीड लाख अनुदान वाटपया मेळाव्यात छाया कोचरेकर, स्वरुपानंद गावडे, स्मिता गावडे, महम्मद नदाफ, सुभाष गावडे, प्रकाश वारंग, कांचन घाडी, चंद्र्रकांत कोळसुलकर, नमिता भगत, निखिल तोरसकर, समीर नाईक, आयरिश डिसोजा, लिलावती जाधव, सुरेश सामंत, अभय मडकईकर, अर्चना परब, नागेश परब, आकाश कांबळे, क्लॅटल आशज्ज, ध्रुव कुलकर्णी, श्रृती पाटील आदींना मिळून १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच अनुदान वाटप करण्यात येणार आहे.