शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार - राहुल गांधी
2
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
3
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
4
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
5
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
6
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतंय"
7
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
8
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
9
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
10
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
11
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
12
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
13
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
14
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
15
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
16
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
17
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
18
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
19
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
20
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक

सुदेश भोसलेंच्या साथीने सावंतवाडीवासीय थिरकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 5:33 PM

सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची तिसरी रात्र ‘मेलडी मेकर्स’ या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या हिंदी, मराठी जुन्या-नव्या गाण्यांनी यादगार ठरली.

सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची तिसरी रात्र ‘मेलडी मेकर्स’ या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या हिंदी, मराठी जुन्या-नव्या गाण्यांनी यादगार ठरली. आपल्या सुरेल आवाजात दर्दभरी  गाण्यांच्या सादरीकरणाने भोसले यांनी उपस्थितांची हृदये जिंकली. मेरे मेहबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलिओमे शिकायत होगी.., ये जो मोहब्बत है ये उनका है काम रहने दो छोडो भी जाने दो यार, इंतेहा हो गई इंतजारकी.., अरे देखा ना हाय रे सोचा ना... अशी एकापेक्षा एक गाजलेली जुनी गाणी सादर करत सावंतवाडीकरांना शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवले.सावंतवाडी नगरपालिका आयोजित पर्यटन महोत्सवाच्या तिसºया रात्री मुंबई येथील मेलडी मेकर्स हा सुदेश भोसले  व सहकलाकारांच्या हिंदी, मराठी जुन्या-नव्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक विजेत्या स्पर्धकांचा कार्यक्रम पार पडला. यात मळेवाड येथील ज्ञानदीप कलामंच, मसूरकरवाडी यांचा माऊली माऊली... व ओंकार कलामंचचा लैला हो लैला... हा गु्रप डान्स लक्षवेधी ठरला. मेलडी मेकर्स या मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथेप्रमाणे शिवरामराजे यांच्या पुतळ्याला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान, काही वेळाने मंचावर एन्ट्री केलेल्या सुदेश भोसले यांनी सावंतवाडीकरांचे आभार व्यक्त करीत....भोले हो भोले मेरे यार को मनादे... ओ प्यार फिर जगा दे...हे गाणे सादर करीत किशोरकुमार यांची आठवण करून दिली. त्यानंतर मेरे मेहबूब कयामत होयी आज रुसवा तेरी गलिओ मे शिकायत होगी, ये जो मोहब्बत है ये उनका है काम रहने दो छोडो भी जाने दो यार, इंतेहा हो गई इंतजार की, अरे देखा ना सोचा ना, गोविंदा आला रे आला, मच गया शोर सारे नगरी मे... अशी नॉनस्टॉप गाणी सादर करीत सावंतवाडीकरांना फेर धरायला लावला. सर्वांनी टाळ््यांच्या कडकडाटात त्यांना प्रोत्साहन दिले. अधूनमधून शत्रुघ्न सिन्हा यांच्या आवाजाची झलकही त्यांनी सादर करीत उपस्थितांमध्ये हशा पिकविला. त्यानंतर  अमिताभ बच्चन यांच्या खाईके पान बनारसवाला...छोरा गंगा किनारेवाला....या गाण्यावर लहान मुलांना मंचावर घेत फेर धरायला लावले. त्यानंतर तेरी मखणा..तेरी सोनीये... एव्हरी बडी शॉबा शॉबा, सोणा सोणा दिल मेरा सोणा हे दमदार गाणे कल्याणी व अमोल यांच्या साथीने सादर केले. भोसले यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थितांच्या पसंतीस उतरतील अशी मोजकी गाणी गात आपल्या गायकीची छाप सर्वांवर पुन्हा एकदा टाकली. मराठीतील वल्हव रे नाखवा, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का, अग हिल हिल पोरी हिला तुझ्या कपाळीला टिळा,  गोविंदा रे गोपाळा ही गाणी भोसले यांनी सादर केली. एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमाने तिसºया दिवशीची रात्र सर्वांसाठी यादगार ठरली.चौकट‘वन्स मोअर’सह रसिकांनी केला जल्लोषयावेळी प्रसिध्द कलाकार राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत केलेले ‘गुलाबी आखे ये जो तेरी देखी...’ हे गीत गायक अमोल याने सादर करत कार्यक्रमात रंगत भरली. त्यानंतर कैलास खैर यांच्या आवाजातील ‘प्रित की मोर ऐसी लागी..तेरी दिवानी..’. या गाण्याला उपस्थितांनी वन्स मोअर देत जल्लोष केला. त्यानंतर मंचावर आलेल्या कल्याणी या गायिकेने अमोल याला साथ देत आशा भोसले यांच्या आवाजातील ‘जवान जानेमन हसीन दिलरुबा..., सैराट झालं जी...हे गाणे सावंतवाडी पर्यटन महोत्सवात  सादर केले. ते उपस्थितांच्या पसंतीस पडले.