शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील बापर्डे गावात आढळला चक्क अर्ध्या किलोचा हापूस आंबा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 30, 2024 18:13 IST

अयोध्याप्रसाद गावकर देवगड : देवगड तालुक्यातील बापर्डे येथील आंबा बागायतदार पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांच्या बागेतील झाडावरील एका फळाचे वजन ...

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देवगड तालुक्यातील बापर्डे येथील आंबा बागायतदार पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांच्या बागेतील झाडावरील एका फळाचे वजन तब्बल ५२५ ग्रॅम आढळून आले आहे. सरासरीपेक्षा दुप्पट वजन असून, झाडावरील अन्य फळेदेखील ४५० ते ५०० ग्रॅम वजनाची आहेत.बापर्डे येथील पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांची गावातच १०० हून अधिक झाडांची आंबा बाग आहे. या बागेतील आंबा काढणी सध्या सुरू आहे. दरम्यान, आंबा काढणी करताना एका झाडावरील फळे इतर झाडांच्या तुलनेत खूप मोठी दिसून आली.त्यामुळे नाईकधुरे यांनी २१ मार्चला आंबा फळाचे वजन केले असता त्यांना फळाचे वजन ५२५ ग्रॅम झाले. त्यानंतर तीन दिवसांनी फळाच्या वजनात २२ ग्रॅमने घट झाली. २४ मार्चला वजन ५०३ ग्रॅम झाले. देवगड हापूस फळाचे वजन सरासरी २०० ग्रॅम ते २५० पर्यंत असते. झाडांना योग्यवेळी पाणी दिले, खत व्यवस्थापन नीटनेटके केले तर फळाचे वजन वाढते. हे वजन देखील ३५० ग्रॅमपर्यंत जाते. परंतु पुरुषोत्तम नाईकधुरे यांच्या बागेत आढळून आलेला आंब्याचे वजन जास्त असल्याने तो कौतुकाचा विषय बनला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा