शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीमुळेच २५ वर्षानंतर गेळे गावाला सुवर्ण दिवस - पालकमंत्री रविंद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: October 9, 2024 16:54 IST

मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत जमिनीचे वाटप 

सावंतवाडी : वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने सुटला आहे. २५ वर्षानंतर हा सुवर्ण दिवस महायुती सरकारमुळेच पाहात आहे. त्यामुळे आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी ठेवा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.गेळे कबुलायतदार महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचे वाटप व पोटहिस्सा मोजणीच्या कागदपत्रांचे वाटप सावंतवाडीत पार पडले. मंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात  ग्रामस्थांना  पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लखमराजे भोंसले, राजन तेली, संजू परब, प्रभाकर सावंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री चव्हाण म्हणाले, आंबोली, चौकुळ व गेळे या गावांमधील कबूलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विषय पुढे नेण्याचे काम केले. तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मी सातत्याने या प्रश्नाच्या पाठीशी राहून हा प्रश्न सोडविला. महायुती सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हा प्रश्न सुटू शकला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मंत्री केसरकर यांनी, आंबोली चौकुळ गेळे ही तीन गावे पर्यटनाचा केंद्रबिंदू राहणार असून मला ही गावे नेहमीच जवळची वाटली आहेत. आज खऱ्या अर्थाने लोकांचे सरकार कसे असते हे बघितले. आता या तीन गावांमधील ३५ सेक्शनचा प्रश्न राहिला नसून हे सेक्शन हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता पूर्ण जमिन वाटप होणार आहे असेही केसरकर म्हणाले. यावेळी गेळेच्या गावाच्या वतीने पालकमंत्र्यासह, शिक्षण मंत्री व लखम सावंत भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गguardian ministerपालक मंत्रीDeepak Kesarkarदीपक केसरकर