शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी पालकमंत्र्यांची धडपड-राजन तेली यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:47 IST

पालकमंत्री दीपक केसरकर हे निव्वळ चिपी विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी धडपड करीत आहेत. असा आरोप करतानाच पालकमंत्र्यांना  विमानतळ सुरू करण्याची एवढीच घाई होती तर त्यांनी विमानतळापर्यंत जाणारे रस्ते, वीज, पाणी या मुलभुत सुविधा

ठळक मुद्देपालकमंत्री दीपक केसरकर हे निव्वळ चिपी विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी धडपड करीत आहेत. असा आरोप करतानाच पालकमंत्र्यांना  विमानतळ सुरू करण्याची एवढीच घाई होती तर त्यांनी विमानतळापर्यंत जाणारे रस्ते, वीज, पाणी या मुलभुत सुविधा

कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर हे निव्वळ चिपी विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी धडपड करीत आहेत. असा आरोप करतानाच पालकमंत्र्यांना  विमानतळ सुरू करण्याची एवढीच घाई होती तर त्यांनी विमानतळापर्यंत जाणारे रस्ते, वीज, पाणी या मुलभुत सुविधा आता पर्यन्त का निर्माण केल्या नाहीत? असा प्रश्‍न भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी  उपस्थित केला आहे.

      कणकवली येथे  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, चिपी येथील विमानतळासाठी कुंभारमाठ ते चिपी पर्यंत भूमीगत वीज वाहिन्या टाकण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. मात्र पालकमंत्री अजूनही ओव्हरहेड वाहिन्यांसाठीच आग्रही भूमिका घेत आहेत. तसेच त्याबाबतची चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांना देत आहेत.

        चिपी विमानतळासाठी चिपी, परुळे या भागातील जमिनी नाममात्र दराने खरेदी करण्यात आल्या. आता ज्या काही जमिनी शिल्लक आहेत, तेथे स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय करायचे आहेत. मात्र या जमिनीवरुन  उच्चदाब क्षमतेच्या वीज वाहिन्या गेल्या तर व्यवसाय, उद्योगधंदे करता येणार नाहीत. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा ओव्हरहेड वीज वाहिन्यांना विरोध आहे.

        चिपी, परुळे भागातील भूमिपूत्रांची ही व्यथा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिली. तसेच ओव्हरहेड वीज वाहिन्या विमानाच्या उड्डाणावेळी अडथळा ठरू शकतात. त्यामुळे विमानतळ प्राधिकरण, आयआरबी, महावितरण आदींच्या बैठकीत भूमीगत वीज वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांत या भूमिगत वीज वाहिन्यांचे काम देखील सुरू होईल; मात्र पालकमंत्री दीपक केसरकर अजूनही ओव्हरहेड वाहिन्यांसाठी आग्रही आहेत. त्यांची ही भूमिका अनाकलनीय आहे.         चिपी विमानतळापासून काही अंतरावर कर्ली नदीचे पात्र आहे. या नदीतून मुंबई येथे असलेल्या "कॅटरमॅन' बोट सेवेप्रमाणे सेवा सुरू व्हायला हवी. तसे झाल्यास चिपी विमानतळावर उतरणारे प्रवासी सिंधुदुर्ग किनारपट्टीसह गोव्यात जाऊ शकतात. यातून विमानतळाला देखील चालना मिळणार आहे. कर्ली नदीतून बोट वाहतूक सुरू होण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे तेली यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री नोकऱ्या देणार का  ?

चिपी विमानतळाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांसाठी पालकमंत्र्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले. तसे शेकडो अर्ज चिपी, परुळे आदी ग्रामपंचायतींमध्ये जमा झाले आहेत . हे सर्व अर्ज पालकमंत्र्यांनी विमानतळाची उभारणी करणाऱ्या आयआरबी कंपनीकडे दिले आहेत. आता हे अर्ज करणाऱ्यांना पालकमंत्री नोकऱ्या देणार का? असाही प्रश्‍न तेली यांनी उपस्थित केला. तसेच संबधित ग्रामपंचायतीचे सरपंच बेरोजगारांच्या प्रश्नामुळे कंटाळले आहेत. त्याना बेरोजगार आम्हाला नोकरी कधी मिळणार असे वारंवार विचारत आहेत. असे राजन तेली यानी यावेळी सांगितले .

टॅग्स :Airportविमानतळsindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर