शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आकाश-पाताळ एक करेल, पण सेना जनतेची साथ सोडणार नाही - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 15:43 IST

शिवसेनेला कोकणाने बरेच काही दिले आहे. तसे शिवसेनेनेही कोकणला दिले आहे.

सिंधुदुर्ग : शिवसेनेला कोकणाने बरेच काही दिले आहे. तसे शिवसेनेनेही कोकणला दिले आहे. त्यामुळे शब्द आणि विश्वास हे नाते निर्माण झाले आहे. कोकणाने पाच खासदार दिले. तर शिवसेनेने सात मंत्री कोकणातील दिले आहेत. त्यामुळे भविष्यात आमचे लक्ष विधानसभा हेच असणार आहे. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आलेला निधी, केलेले विकासकाम जनतेपर्यंत पोहोचवावे. शिवसेना आकाश-पाताळ एक करेल, पण कधीही जनतेची साथ सोडणार नाही. आम्ही सत्तेत खारीच्या वाट्यासारखे असलो तरी जनतेसाठी रात्रंदिवस काम करण्याची प्रेरणा शिवसेनाप्रमुखांकडून घेतली आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील प्रमुख शिवसैनिकांची बैठक  शनिवारी पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, बाबुराव धुरी, बाळा दळवी, दोडामार्ग सभापती गणपत नाईक, वेंगुर्ले सभापती यशवंत परब, सावंतवाडी संपर्कप्रमुख शैलेश परब, राजू नाईक, शब्बीर मणियार आदी उपस्थित होते. सर्वात जास्त निधी आम्ही आणला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गच्या इतिहासात कोणीही निधी आणला नाही तेवढा आम्ही आणला आहे. विकासकामे करा, सिंधुदुर्गचे नाव मोठे करा, हा जिल्हा स्वच्छ व सुंदर जिल्हा होऊ दे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार वैभव नाईक, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, प्रकाश परब यांनी विचार मांडले. मंत्री देसाई व केसरकर यांचे स्वागत तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राजू नाईक व शब्बीर मणियार यांनी केले. राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSubhash Desaiसुभाष देसाई