शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Narayan Rane: 'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 11:55 IST

Narayan Rane: केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार? असा सवाल करत अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

Narayan Rane: केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार? असा सवाल करत अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना राणेंनी अजित पवार अज्ञानी असल्याचा घणाघात केला आहे. 'अजित पवार अज्ञानी असून त्यांनी त्यांच्या खात्याकडे लक्ष द्यावं, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही', असं नारायण राणे म्हणाले. 

संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; 'सामना'वर 'प्रहार' करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल

जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणे आज कणकवलीत आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "अजित पवार अज्ञानी आहेत. त्यांना केंद्रातलं काही कळत नाही. त्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावं. ते फक्त आपल्यामागे लागलेल्या चौकशा आणि आरोप टाळण्यात हुशार आहेत", असं नारायण राणे म्हणाले.  

राज्यात नव्या उद्योजकांना प्रेरणा देणारराज्यात लघू उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी युवा उद्योजकांकडून अर्ज मागवून त्यांची छाननी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर सुयोग्य आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना माझ्या खात्यामार्फत प्रोत्साहन, मार्गदर्शन दिलं जाईल, असं नारायण राणे म्हणाले. 

संदुक कसली उघडताय? रोखठोक काय ते बोलातुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. "एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना सामनाचा संपादक, ना धड प्रवक्ता. त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय", असं नारायण राणे म्हणाले. 

जनआशीर्वाद यात्रेत 'मांजर' आडवी गेलीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाचं पालन करत आम्ही जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय. काही ठिकाणी लोक सहा-सात तास उभं राहून यात्रेला प्रतिसाद देतायत. पण यात्रेत काही अपशकून देखील झाले. 'मांजर' आडवी गेली. पण मी काही त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. यात्रा आजही मोठ्या उत्साहात आणि प्रचंड प्रतिसादात सुरू आहे, असं राणे म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ajit Pawarअजित पवार