शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक, ऐनारीवासीय संतप्त, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:43 IST

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी यु. जी. कदम हे टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांशी उद्धटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, या तलाठ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.

ठळक मुद्देतलाठ्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक, ऐनारीवासीय संतप्त पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

वैभववाडी : पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी यु. जी. कदम हे टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांशी उद्धटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, या तलाठ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.ऐनारी हे गाव भुईबावडा सजामध्ये येते. पूरस्थितीमुळे ऐनारी येथील अनेक घरे, गोठे आणि काजू बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ग्रामस्थ तलाठी कदम यांच्याकडे आग्रह धरीत असतात. परंतु, पंचनामे करणार नाही. काही करायचे ते करा अशा प्रकारची उद्धट उत्तरे ते ग्रामस्थांना देतात. गेली दोन वर्षे कदम या गावात असून ग्रामस्थांशी त्यांचे वर्तन चांगले नाही.त्यामुळे २०१७ मध्ये त्यांची गावातून बदली करावी असा ठराव ऐनारी ग्रामसभेत करण्यात आला होता. आताही आक्रमक भूमिका घेत या तलाठ्याची तत्काळ गावातून उचलबांगडी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री केसरकर आणि जिल्हाधिकारी यांना शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, तलाठी कदम यांच्यामुळे ऐनारी गावातील अनेक कामे रखडली आहेत. पूरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून आधार देण्याची गरज असताना कदम हे तेथील लोकांना आणखी त्रास देत आहेत. तरी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.खात्री करून निर्णय घेऊ : तहसीलदारऐनारी ग्रामस्थांनी आपल्याकडे निवेदन दिलेले आहे. ग्रामस्थांच्या निवेदनाची खात्री करून वरिष्ठांच्या सूचनेनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार रामदास झळके यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग