शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 12, 2024 19:02 IST

गिरीश परब सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दुपारपासून जोर धरला आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दुपारच्या सत्रात मुसळधार ...

गिरीश परबसिंधुदुर्ग : जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दुपारपासून जोर धरला आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस झाला. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.७ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. सर्वच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेकडो घरांची पडझड होऊन सुमारे ४ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. एक वृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यानंतर पावसाने थोडी उसंत घेतली होती. बऱ्याच ठिकाणी ऊन पडले होते.दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. एकावर एक अशा मुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे शेतीच्या कामांना पुन्हा एकदा गती प्राप्त झाली आहे. पाऊस नव्हता त्या काळात पाण्याअभावी लावणीची कामे थांबली होते. तीन ते चार दिवसानंतर पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने लावणीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी शेतीच्या कामात गुंतलेला आहे.

पावसाची आकडेवारी..!सिंधुदुर्गमध्ये गेल्या २४ तासात म्हणजेच शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे - देवगड - ११.५, मिमी, मालवण १९.३ मिमी, सावंतवाडी १५.३ मिमी, वेंगुर्ला ६.६ मिमी, कणकवली १४.९ मिमी, कुडाळ १२.८ मिमी, वैभववाडी २०.१ मिमी, दोडामार्ग १० मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस