शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पदाधिकाऱ्यांच्या राजीनामास्त्रानंतर प्रदेश काँग्रेस नरमले, समीर वंजारी यांच्या नियुक्तीला स्थगिती

By अनंत खं.जाधव | Updated: September 29, 2023 18:50 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष ईशाद शेख यांना तडकाफडकी हटवून समीर वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली खरी ...

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष ईशाद शेख यांना तडकाफडकी हटवून समीर वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली खरी मात्र आता हीच नियुक्ती वादात सापडली. यानंतर जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारल्यानंतर प्रदेश काँग्रेसने वंजारी यांच्या निवडीलाच स्थगिती दिली असून ईशाद शेख यांना जिल्हा काँग्रेसचे प्रभारी नेमले आहे. याबाबतचे पत्र शुक्रवारी पाठविण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपदी ईशाद शेख यांची नेमणूक दीड वर्षापूर्वी करण्यात आली होती. मात्र दोन दिवसापूर्वीच शेख यांना तडकाफडकी बदलून त्याच्या जागी समीर वंजारी यांची नेमणूक करण्यात आली. मात्र वंजारी यांची नियुक्ती वादात सापडली. पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नाही, असा आरोप करीत जेष्ठ नेते विकास सावंत यांच्यासह तालुकाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले सामुदायिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिले.तसेच प्रसिद्धी पत्रक देत वंजारी यांची नियुक्ती मान्य नसल्याचे सांगून चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदाच्या बाबत जो निर्णय घेण्यात आला, तसा निर्णय या ठिकाणी घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली तसे पत्र तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले आहे. शेख यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणूका पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रभारी शंशाक बावचकर यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली होती. मात्र या ठरावाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांना किंमत दिली जात नसेल तर आम्ही सामुहिक राजीनामे देत असल्याचे म्हणत राजीनामा पत्रावर सहया केल्या आहेत.यात प्रदेश प्रतिनिधी विकास सावंत, हीरोजी परब, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मेघनाद धुरी, महेंद्र सांगेलकर, प्रदिप मांजरेकर, वासुदेव नाईक, दालमिया पाटणकर, विजय प्रभू, किरण टेंबूलकर, नागेश मोर्ये, उत्तम चव्हाण, प्रविण वसनकर, उमेश कुलकर्णी, सिध्देश परब, कृष्णा धाऊसकर, सुभाष दळवी, केतन गावडे, आनंद परुळेकर, जगन्नाथ बोंद्रे, राघवेंद्र नार्वेकर, अफरीन करोल आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या.दरम्यान पदाधिकाऱ्यांकडून सामुदायिक राजीनामास्त्रा नंतर प्रदेश काँग्रेसकडून यांची गंभीर दखल घेत समीर वंजारी याच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाला स्थगिती देत ईशाद शेख यांचीच नियुक्ती कायम ठेवली आहे. याबाबतचे पत्र शुकवारी प्राप्त झाले आहे. यापत्रानंतर मात्र अद्याप पर्यत कोणीही प्रतिकिया दिली नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणcongressकाँग्रेस