शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर सिंधुदुर्गात अर्लट, डोंगरभागातील घराचे सर्व्हेक्षण सुरू 

By अनंत खं.जाधव | Updated: July 21, 2023 17:59 IST

माथेरानचा व्हिडिओ आंबोली म्हणून व्हायरल, कारवाई होणार

सावंतवाडी : रायगड जिल्ह्यातील खालापूर इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरभागातील घराचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. काही ठिकाणी यापूर्वी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत तिथे आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवण्यात आल्या आहे. जिल्ह्याला २४ जुलैपर्यंत अर्लट देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी दिली. तसेच आपत्कालीन स्थितीचे चुकीचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर पोलिस योग्य ती कारवाई करतील असा इशाराही दिला.सावंतवाडीत आज, शुक्रवारी चार तालुक्याची आपत्कालीन बैठक जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थित पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छीद्र सोकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.इर्शाळवाडीसारखी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही. मात्र, शिरशिंगे, असनिये, झोळंबे, कर्ली आदी गावाबाबत काळजी घेत असून अधिकाऱ्यांनी गावात जाऊन गावकऱ्यांशी चर्चा ही केली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शाळा महाविद्यालये तसेच आरोग्य यंत्रणेना विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व घाटमार्गावर बांधकाम विभागाकडून प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. घाटमार्गात अडथळा आल्यास यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माथेरानचा व्हिडिओ आंबोली म्हणून व्हायरल माथेरान येथील व्हिडिओ हा आंबोलीचा असल्याचे सांगून व्हायरल करण्यात येत आहे. अशा व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असून असे व्हिडिओ व्हायरल करण्यात येऊ नये या सर्व प्रकाराची पोलीस चौकशी करतील असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अर्लट सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत रेड अर्लट असणार आहे. त्यामुळे कामाशिवाय कोणी बाहेर पडू नये असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यानी यावेळी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlandslidesभूस्खलनcollectorजिल्हाधिकारी